आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कार करुन गळ्यात टाकला लोखंडी रॉड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- गेल्‍या वर्षी दिल्‍लीत झालेल्‍या सामुहिक बलात्‍काराच्‍या घटनेची पुनरावृत्ती पश्चिम बंगालच्‍या माल्‍दा जिल्‍ह्यात घडली आहे. एका अल्‍पवयीन विद्यार्थिनीवर बलात्‍कार केल्‍यानंतर तिच्‍या गळ्यात लोखंडी रॉड निर्दयीपणे टाकण्‍यात आला. त्‍यामुळे तिचा आवाज गेला. तरीही तिने आरोपीचे नाव कागदावर लिहून अत्‍याचाराला वाचा फोडली. याप्रकरणी अभय मंडल नावाच्‍या आरोपीला अटक करण्‍यात आली आहे. पीडित मुलीला रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले असून उपचार सुरु आहेत.

पीडित मुलीने सांगितले, की एका शेतात काम करणा-या मजुराने तिला सुती कपडे आणि सायकल देण्‍याचे आमिष दाखवून बलात्‍कार केला. आरोपीने बलात्‍कार केल्‍यानंतर तिच्‍या गळ्यात लोखंडी रॉड टाकला. त्‍यामुळे तिचे स्‍वरयंत्र खराब झाले आहे. त्‍यामुळे ती बोलू शकत नाही. ती गंभीर जखमी झाली असून पुन्‍हा बोलण्‍यात कधी सक्षम होईल, हे सांगता येणार नाही, असे डॉक्‍टरांनी सांगितले.

पीडित मुलीच्‍या विधवा आईसोबत आरोपीचे होते सबंध... वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये..