आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka And Vadra Come To Ajmer For Admission Of Their Daughter Miraya Vadra

अजमेरला शिकणार प्रियंका यांची मुलगी, आधी राजांच्या मुलांनाच मिळत होते अॅडमिशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिराया आणि प्रियंका गांधी-वढेरा - Divya Marathi
मिराया आणि प्रियंका गांधी-वढेरा
अजमेर - प्रियंका गांधी-वढेरांची कन्या मिराया आता मेयो कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. याच कॉलेजमध्ये जयपूरच्या पुर्वाश्रमीच्या राजपरिवारातील सदस्य महाराज पद्मनाभ देखिल आहे. मुलीच्या अॅडमिशनसाठी प्रियंका गांधी मंगळवारी अजमेरला आल्या होत्या.

काय खास आहे या कॉलेजमध्ये
- कॉलेजमध्ये अत्याधुनिक क्लासरुम आहेत. 187 एकर परिसरात वसलेल्या या कॉलेजमध्ये 12 बोर्डिंग हाऊस आहेत. तीन भव्य डायनिंग हॉल आहेत.
- कॉलेजचे स्वतःच्या मालकीचे पोलो मैदान असून येथे 50 घोड्यांसाठीचा तबेला आहे. 9 होलचे गोल्फ कोर्स हे देखिल कॉलेजचे वैशिष्ट्य आहे.
- विद्यार्थ्यांना पोलोसोबत हॉर्स रायडिंग देखिल शिकवले जाते.
- 400 मीटरचा अॅथलिट ट्रॅक आणि 110 मीटरचा ऑब्स्टिकल रेस ट्रॅक विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव देणारा आहे.
- दोन स्विमिंग पुल आणि अत्याधुनिक जिम्नॅशियम मध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते.
- 10 मीटरची मॉडर्न एअर रायफल शुटिंग रेंज आहे. संपुर्ण देशात ही शुटिंग रेंज प्रसिद्ध आहे.
- कॉलेजचे स्वतःचे दोन क्रिकेट स्टेडियम आहेत. येथे टर्फ विकेट आणि सेपरेट नेट्स आहेत. त्यासोबतच 14 टेनिस कोर्ट, पाच स्कॉश कोर्ट, चार बास्केटबॉल कोर्ट, पाच सॉसर, दोन हॉकी फिल्ड्स, एक बॅडमिंटन कोर्ट, एक ट्रेंपोलिन, एक बॉक्सिंग रिंग, एक क्लायबिंग वॉल आणि प्रत्येक बोर्डिंग हाऊसमध्ये इनडोअर टेबल टेनिस कोर्ट आहे.
- परिसर हरित राहाण्यासाठी वॉटर हार्वेस्टिंगसाठी एक तलाव तयार करण्यात आला आहे.

कोणी स्थापन केले कॉलेज
- मेयो कॉलेज कसे असावे याची कल्पना कर्नल एफकेएम वॉल्टर यांनी 28 मे 1869 मध्ये केली होती.
- या कॉलेजच्या स्थापनेआधी 1870 मध्ये लॉर्ड मेयोने प्रस्ताव दिला होता, की या कॉलेजमध्ये ब्रिटीश राज्यकर्त्यांच्या प्रमुखांची आणि संस्थानिक, ठाकुरांची मुलेच शिक्षण घेतील.
- 1875 मध्ये सहाव्या अर्ल ऑफ मेयो रिचर्ड ब्रुकने याची स्थापना केली. मुळात ही शाळा असून लॉर्ड मेयोने याला शाळेऐवजी राजकुमारांचे कॉलेज संबोधले होते, त्यामुळे याला आजही कॉलेज म्हटले जाते.
- मेयो कॉलेजचा स्थापत्य अभियांता मेजर मांट होता. कॉलेजचे प्रमुख भवन जून 1885 मध्ये उभे राहिले होते. त्यासाठी तेव्हा 3.28 लाख रुपये खर्च आला होता.
- 1875 च्या ऑक्टोबरमध्ये मेयो कॉलेजमध्ये पहिले प्राचार्य सर ऑलीवर सेंट जॉन यांनी अलवरचे तत्कालिन महाराज मंगलसिंह यांना अॅडमिशन दिले. पहिल्या दिवशी केवळ मंगलसिंह यांचे एकमेव अॅडमिशन झाले.
- कॉलेज बांधकामाचे मॉडेल आजही लंडनच्या ब्रिटीश संग्रहालयात आहे.

या दिग्गजांनीही घेतले या कॉलेजमध्ये शिक्षण
अभिनेता विवेक ओबेरॉय, माजी केंद्रीय मंत्री आणि पूर्वाश्रमीचे संस्थानिक परिवारातील जसवंतसिंह, नटवरसिंह, उदयपूर राजघराण्यातील सदस्य अरविंदसिंह मेवाड, अभिनेता टीनू आनंद, लेखक विक्रम चंद्रा, उद्योगपती रविकांत, आमदार मानवेंद्रसिंह, गंगानगर राजवंशाचे सदस्य गंगासिंह.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कसे आहे कॉलेज...