आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Misa Bharti Allegation Of Breaking The EVM,Bihar News

मीसा भारतींवर इव्हीएम मशीन तोडल्याचा आरोप, पोलिंग एजंटचेच कृत्य- राजद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांची कन्या आणि पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. मीसा भारती यांच्यावर मतदान केंद्रात घुसून इव्हीएम मशीन तोडल्याचा आरोप करण्यात येत आहे. मतदान केंद्राच्या पीठासीन अधिका-याने हा आरोप केला आहे. स्थानिकांची माहितीनुसार मतदार संघातील मतदानाची माहिती घेत असताना डॉ. मीसा भारती विक्रम विधानसभा मतदारसंघातील डिहरी येथील मतदान केंद्रात समर्थकांसह बळजबरीने घुसल्या आणि त्यांनी मतदान यंत्राची तोडफोड केली.
पीठासीन अधिका-याच्या तक्रारीनुसार एसडीओ घटनास्थली तपासासाठी दाखल झाले आहे. पीठासीन अधिका-याच्या तक्रारीत तथ्य आढळले तर मीसा भारतींवर कारवाईची शक्यता आहे.
या प्रकरणावर राजदचे राष्ट्रीय प्रवक्ता मनोज कुमार म्हणाले, राजद उमेदवार मीसा भारती यांनी कोणतेही अनुचित कृत्य केलेले नाही. त्या मतदान केंद्रात जाण्याआधीच इतर लोकांनी मतदान केंद्र ताब्यात घेतलेले होते. मीसा यांनी त्याला विरोध केल्यानंतर त्यांनी इव्हीएम मशीन तोडले.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, मतदान केंद्रातील दृश्य