आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रायव्हेट पार्ट्सवर पतीने मारल्या लाता, 21 दिवस मेलेले बाळ पोटात वागवत राहिली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीतापूर (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात एका महिलेने पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. महिलेने सांगितले, 5 ऑगस्टला माझ्या सासूचे निधन झाले. शोकसभे दरम्यानच पती आणि सासरच्या लोकांनी एका खोलीत रात्रभर बंद करुन मला बेदम मारहाण केली. बाथरुमलाही जाऊ दिले नाही. अपल पोलिस अधीक्ष ओ.पी.सिंह यांनी हे गंभीर प्रकरण असल्याचे सांगत तत्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत.
काय आहे प्रकरण
- ही घटना उत्तर प्रदेशातील सीतापूर येथील आहे.
- राधाने (नाव बदलले आहे) पोलिसांना सांगितले, चंद्रमोहनसिंह आणि मी नववीत होतो तेव्हापासून एकमेकांना पसंत करत होतो.
- घरच्यांचा विरोध असतानाही आम्ही रात्री एकांतात भेटत होतो. आमच्यात फिजिकल रिलेशन देखील होते.
- त्यातच चंद्रमोहनने मला दारु पाजली आणि एमएमएस तयार केला.
- माझे कुटुंबीय चंद्रमोहनसोबत लग्न लावून देण्यास तयार नव्हते. तेव्हा त्याने तो एमएमएस व्हायरल करण्याची धमकी दिली.
- त्यानतंतर 21 एप्रिल 2015 रोजी आमचे लग्न झाले.
- तेव्हापासून माझ्यावर अत्याचाराचे सत्र सुरु झाले.
- येता-जाता भाया माझी छेड काढत होता. 2015 च्या नोव्हेंबरमध्ये मी हे पतीला सांगितले.
- यानंतर त्याने स्वतःच्या मोठ्या भावाला काही म्हणण्याऐवजी माझ्या प्रायव्हेट पार्ट्सवर लात मारली. एक-दोन नाही तर त्याने असे अनेकदा केले. तेव्हा मी गर्भवती होते. यामुळे माझ्या बाळाचा गर्भातच मृत्यू झाला.
- त्यानंतर 21 दिवस मेलेले बाळ मला बळजबरीने गर्भातच ठेवायला सांगतिले.
- मी विनवण्या करत होते, मात्र मला डॉक्टरांकडे घेऊन गेले नाही.
- डॉक्टरांकडे नेण्यासाठी एक अट ठेवली, घरातील सर्व काम तू एकटीने करायचे.
- अट मान्य केल्यावर मला हॉस्पिटलला घेऊन गेले. डॉक्टरांनी सांगितले, बाळाचा 21 दिवसांपूर्वीच मृत्यू झाला. लवकर उपचार झाले नाही तर तुझाही मृत्यू झाला असता.
- त्यानंतर मी माहेरी आले.
सासरच्या लोकांनी जनावरांप्रमाणे मारेल, बाथरुममध्येही जाऊ देत नव्हते
- 5 ऑगस्टला माझ्या सासूचे निधन झाले होते, तेव्हा मी सासरी गेले.
- शोकसभेदरम्यानच सासरच्या लोकांनी मला एका रुममध्ये नेले आणि बेदम मारले. रात्रभर एका खोलीत डांबून ठेवले.
- या दरम्यान त्यांनी मला बाथरुममलाही जाऊ दिले नाही.
- राधाने सांगितले, की यानंतर मी पुन्हा माहेरी आले आणि कुटुंबीयांना आपबीती सांगितली. 7 ऑगस्टला त्यांना घेऊन पोलिस स्टेशनला गेले.
- 29 ऑगस्टला गुन्हा नोंद झाला. मात्र 9 दिवसांमध्ये कोणतीच कारवाई झाली नाही, म्हणून पीडितेने मीडियाकडे मदतीची याचना केली.
लग्नात 20 लाख रुपये खर्च, डिमांड वाढत गेली
- राधाच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की लग्नात जवळपास 20 लाख रुपये खर्च झाले होते.
- त्यानंतर ते लोक राधाकडे वारंवार पैशांची मागणी करत होते.
- त्यांची डिमांड पूर्ण झाली नाही तर, राधा गर्भवती असताना तिला मारहाण केली जात होती.
- तिला थंड फरशीवर झोपवत होते, 24 तासांमध्ये फक्त 3-4 तास आराम करु देत होते.

लवकरच अटकेची कारवाई
अपर पोलिस अधीक्षक सिंह यांनी सांगितले की प्रकरण अतिशय गंभीर आहे.
- आरोपींविरोधात कडक कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
- सर्व आरोपींना लवकरच अटक केली जाईल.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, राधा-चंद्रमोहनचे नववीपासूनचे फोटो...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...