आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणीसाठी भावाने लावली जिवाची बाजी, रक्तबंबाळ होऊनही नराधमांशी भिडला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आग्रा - बहिणीची छेड काढल्याने भाऊ एकट्यानेच 2 गुंडांशी भिडला. दरम्यान, एका नराधमाने त्याच्या मानेवर चाकूने वार केला. जखमी, रक्तबंबाळ होऊनही भावाने एका गुंडाला धरून ठेवले. आणि तोपर्यंत सोडले नाही, जोपर्यँत तिथे आणखी काही लोक मदतीसाठी आले नाहीत. नंतर वाटसरूंनी आरोपीला पकडून बेदम मारहाण केली व पोलिसांच्या स्वाधीन केले. दुसरीकडे, गंभीर जखमी झालेल्या आरोपीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना गुरुवार दुपारची आहे.

 

असे आहे पूर्ण प्रकरण...
- ही घटना हाथरसच्या चंदपा परिसरातील आहे. येथील रहिवासी धर्मेंद्रसिंग कुटुंबासह फरिदाबादमध्ये राहतो.
- लग्न समारंभात भाग घेतली्याने पूर्ण कुटुंबासह गावात आला होता. गुरुवारी दुपारी धर्मेंद्र आपल्या दोन्ही बहिणींना फरिदाबादला पाठवण्यासाठी बसस्टंडवर सोडायला आला होता.
- धर्मेंद्रचा भाऊ नरेश म्हणाला, दोन्ही बहिणींची परीक्षा आहे, यामुळे धर्मेंद्र त्यांना सोडायला जात होता. दरम्यान, दोन गुंड आले आणि त्यांनी छेडछाड सुरू केली.
- एवढेच नाही, एका तरुणाने त्याच्या बहिणीचा हात पकडला. धर्मेंद्रने जेव्हा याचा विरोध केला, तेव्हा एका गुंडाने त्याच्या मानेवर चाकूने वार केले.
- जखमी रक्तबंबाळ अवस्थेतही त्याने एका आरोपीला पकडून ठेवले. झटापट सुरू असल्याचे पाहून लोकांची गर्दी जमली आणि त्यांनीही बदमाशांना पकडले. नंतर बेदम मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन केले. तथापि, दुसरा आरोपी पळून मात्र गेला.

 

काय म्हणतात पोलिस?
- एसपी सुशील धुळे म्हणाले, याप्रकरणी अधिक माहिती घेत आहे. सध्या पीडित तरुणाकडून तक्रार मिळालेली नाही. तो रुग्णालयात आहे. त्यांच्याशी संपर्क करून त्याचा जबाब नोंदवला जाईल, जेणेकरून छेडछाड करणाऱ्याला तुरुंगात डांबले जाऊ शकेल.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...