आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नराधमांनी चेहऱ्यावरही घेतले चावे, गँगरेप करून केला खून; झुडपात आढळला अर्धनग्न मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत सोनमची आई धायमोकलून रडत होती. - Divya Marathi
मृत सोनमची आई धायमोकलून रडत होती.
शहाजहांपूर - यूपीच्या शहाजहांपूरमध्ये एका 7वीच्या विद्यार्थिनीवर गँगरेप करून खून केल्याचे प्रकरण समोर आले आहे. तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला. मृत मुलीच्या शरीरावर ठिकठिकाणी चाकून भोसकल्याच्या खुणा आणि चेहऱ्यावर दाताने चावा घेतल्याचे व्रण आढळले. 
 
असे आहे पूर्ण प्रकरण...
- ही घटना शहाजहांपूरच्या रौजा परिसरातील अहमदनगरची आहे. येथे 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी सोनम सातवीची विद्यार्थिनी होती. 
- कुटुंबीयांनी सांगितले, मंगळवारी सकाळी ती घरापासून जवळच असलेल्या शेतात धान स्वच्छ करायला गेली होती. त्यानंतर घरी परतलीच नव्हती.
- दुपारपर्यंत ती घरी आली नाही म्हणून तिच्या शोधात कुटुंबीयांनी शेतात धाव घेतली. शेतात तिच्या चपला आढळल्या. खूप शोध घेतल्यावर झुडपांमध्ये तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला.
- मृत मुलीच्या शरीरावर चाकूने भोसकल्याच्या आणि चेहऱ्यावर दाताने चावा घेतल्याच्या खुणा होत्या. तिच्या गळ्यात दोरीही अडकवलेली आढळली. कुटुंबीयांचा आरोप आहे की, गुंडांनी गँगरेपनंतर तिचा खून केला.
 
काय म्हणतात पोलिस?
- एसपी सिटी दिनेश त्रिपाठी म्हणाले, रौजा परिसरातील एका मुलीचा मृतदेह उसाच्या शेतात आढळला आहे. कुटुंबीयांकडून अद्याप तक्रार आलेली नाही. प्रकरणाचा तपास सुरू आहे. मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित बातमीचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...