आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Miscreants Shoot Prisoner In ADJ Court Muzaffarnagar News In Marathi

कोर्टरूममध्ये झाला गोळीबार: जीव मुठीत घेऊन पळाले जज, अट्टल गुन्हेगार ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: हल्लेखोर सागर मलिक)

मुजफ्फरनगर- उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये एका कोर्टात सुनावणी सुरु असताना पिस्तूलधार्‍याने अट्टल गुन्हेगाराला गोळ्या घालून ठार मारल्याची खळबळजनक घटना घडली. मुजफ्फरनगरमधील एडीजे-10 कोर्टात सोमवारी जजसमोर ही घटना घडली.
कोर्टरुममध्ये सुनावणी सुरु असताना पिस्तूलधारी हल्लेखोर वकिलांच्या वेशात दाखल झाला. त्याने गुन्हेगार विकी त्यागीवर अनेक गोळ्या झाडल्या. विकी त्यागीचा जागेवरच मृत्यू झाला. गोळीबाराचा आवाज आल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आरोपीला पकडले. हल्लेखोराने सुरक्षा कवच भेदून दुसर्‍या मजल्यावरील कोर्ट रूममध्ये प्रवेश केला. यावरून कोर्ट परिसरातील सुरक्षा-व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

विकी त्यागीला कोदद्वारा तुरुंगातून सुनावणीसाठी अपर जिल्हा कोर्ट मयंक चौहान यांच्या एडीजे-10 कोर्टात आणले होते. कोर्टरूममध्ये एक 17 वर्षीय तरुण वकिलाच्या वेशात दाखल झाला. त्याने पिस्तूलमधून विकी त्यागीवर जवळून गोळ्या घातल्या. गोळीबार होताच कोर्टात खळबळ उडाली. पोलिसांनी हल्लेखोर तरुणाला अटक केली आहे.

एसएसपी कृष्ण बहादुर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर मलिक याने विकी त्यागीची हत्या करून वडिलांच्या हत्येचा बदला घेतला आहे. दोन वर्षांपूर्वी विकी त्यागी याने सागर मलिक याच्या वडिलांची निर्घृण हत्या केली होती.
दुसरीकडे, मृत विकी त्यागीचे पार्थिव पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी विकी त्यागीनेच मुजफ्फरनगर तुरुंगातील शिपाई चुन्नीलाल यांची हत्या केली होती.
फैजाबाद कोर्टातही झाला होता असाच हल्ला...
गेल्या वर्षी जुलैमध्ये फैजाबाद सिव्हिल कोर्ट परिसर बॉम्बस्फोट आणि गोळीबाराने हादरला होता. हल्लेखोरांनी सुल्तानपूरचे माजी आमदार सोनू सिंहचा भाऊ मोनू सिंहला मारण्‍यासाठी आले होते. या हल्ल्यात एका हल्लेखोरासह दोघांचा मृत्यु झाला होता. तसेच सात लोक गंभीर जखमी झाले होते.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, 2013मध्ये विकी त्यागीने गुन्हेगारी जगात पाऊल ठेवले होते.