आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आग्रा येथील चर्चवर हल्ला, मदर मेरी आणि यशू ख्रिस्ताच्या पुतळ्याची विटंबना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग्रा - आग्रा येथील सेंट मेरी चर्चवर बुधवारी रात्री अज्ञातांनी हल्ला करुन तोडफोड आणि मदर मेरीच्या पुतळ्याची विटंबना केली. हल्लेखोरांनी चर्च परिसरातील मदर मेरीच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा घातला तर, यशू ख्रिस्ताच्या मुर्तीचे शिर तोडले. चर्च परिसरात राहात असलेल्या फादरने रात्री अडीच वाजता दरम्यान झालेल्या हल्ल्याची तक्रार पोलिसात दिली आहे.
फादरच्या सांगण्यानुसार, 'हल्लेखोरांनी गेट तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. मग त्यांनी मदर मेरी आणि यशू ख्रिस्ताच्या पुतळ्याची विटंबना केली.' चर्च बाहेर उभ्या असलेल्या वाहनांचीही हल्लेखोरांनी तोडफोड केली.