आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: गुड़गावमध्ये झाले Miss India चे जोरदार स्वागत, म्हणाली- किताबाने आयुष्य बदलले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुडगांव - माझे स्वप्न लेखिका अथवा शास्त्रज्ञ बनण्याचे होते. मात्र कुटुंबियांच्या सहयोगामुळे मला आज फेमिना मिस इंडियाचे मुकुट मिळाले आहे. मात्र मी अजूनही मनातल्या गोष्टी कागदावर लिहिण्याचा प्रयत्न करते, असे फेमिना मिस इंडिया आदिती आर्याने गुडगावच्या एमेटी शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.
या दरम्यान विद्यार्थी-विद्यार्थिनींना यशाचा मंत्र देताना आदिती म्हणाली की, संपूर्ण एकाग्रतेने आणि कष्ट घेऊन आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली तर तुम्हाला तुमचे ध्येय निश्चित गाठता येईल. या दरम्यान शाळेचे संस्थापक आणि मुख्यध्यापक समवेत सर्वच शिक्षकांनी आदितीचे स्वागत केले. आदिती म्हणाली की, मुल्यांचा आदर करत, त्याच मुल्यावर चालत मी आयुष्यात येणाऱ्या संधी मिळवण्याचा प्रयत्न केला. एमेटी शाळेत त्यांना स्वतःच्या कलागुणांचा विकास करण्याची संधी मिळाली. तसेच मिस इंडियाचे मुकूट हे तुमचे आयुष्य़ बदलून टाकते असेही ती एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाली.
पुढील स्लाईडवर पाहा, मिस इंडिया आदिती आर्याचे इतर काही फोटो...