आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पतियाळा - पतियाळाची नवनीतकौर धिल्लन यंदाची मिस इंडिया वर्ल्ड ठरली आहे. सोमवारी रात्री झालेल्या शानदार सोहळ्यात तिला हा किताब बहाल करण्यात आला. ऐश्वर्या रॉय बच्चन हिला मिस वर्ल्डचा किताब मिळाला तेव्हाच नवनीतने मिस वर्ल्ड होण्याचे स्वप्न बघितले होते. यासाठी तिने बरीच मेहनत घेतली आहे. आता मिस वर्ल्डचा शिरपेच जिंकण्यासाठी नवनीतने तयारी सुरू केली आहे. याबाबत दै. दिव्य मराठी नेटवर्कशी तिने केलेली ही बातचीत.
हा किताब मिळेल याची खात्री होती का?
नवनीत : टॉप फाइव्हमध्ये पोहोचण्याआधी थोडे टेन्शन जरूर होते. परंतु ही मजल गाठल्यानंतर शंकेला जागाच उरली नाही. रात्रभर मी शिरपेचाला हात लावून बघत होते.
बालपणापासून ग्लॅमर वर्ल्डमध्ये येण्याची इच्छा होती. शाळा, कॉलेजात असतानाही अभिनय केला आहे काय?
नवनीत : ऐश्वर्या मिस वर्ल्ड झाली होती, तेव्हाच असाच क्राऊन मलाही मिळायला हवा, असे ठरवले होते. त्याच वेळी आई-वडिलांजवळही हे बोलून दाखवले होते.
ध्येय गाठण्यासाठी किती परिश्रम घेतले.
नवनीत : सलग एक वर्षभर जिममध्ये घाम गाळला. योगा, मेडिटेशन केले. डाएटवर विशेष लक्ष दिले.
* यंदाच मिस वर्ल्ड स्पर्धा आहे. ब-याच काळापासून देशाला किताब मिळालेला नाही. तुझी काही खास योजना?
नवनीत : मिस वर्ल्डचा ताजही मिळेल याची मला खात्री आहे. आई-वडील, मित्र-मैत्रिणी, नातलग, मोठ्या भावासह लोकांचे सहकार्य आहे. पुरेपूर परिश्रम करीन आणि हा किताब देशाला मिळवून देईन.
* तू अभिनय करतेस. बॉलीवूडमध्ये जाणार काय?
नवनीत : अभिनयाचा छंद आधीपासूनच आहे. बॉलीवूडमध्ये जाण्याचे स्वप्न आहे आणि मी नक्कीच जाईन.
*. चित्रपटांच्या ऑफर आहेत काय?
नवनीत : टीव्ही चॅनल आणि पंजाबी चित्रपटाच्या अनेक आॅफर आहेत. परंतु मला मिस वर्ल्ड व्हायचे आहे. त्यानंतर
शिक्षण पूर्ण करायचे आहे. मी मीडियाची विद्यार्थिनी आहे. त्यामुळे आधी शिक्षण आणि चित्रपटांबाबत नंतर बघू.
झोया, शोभिता उपविजेत्या
मुंबईत रविवारी रात्री झालेल्या पाँड्स फेमिना मिस इंडिया स्पर्धेत पतियाळाच्या नवनीतकौर धिल्लनने (20, मध्यभागी) यांदाचा मिस इंडिया वर्ल्डचा किताब पटकावला. लखनऊची झोया अफरोझ (18, डावीकडे) मिस इंडिया इंटरनॅशनल ठरली, तर विशाखापट्टणमच्या शोभिता धुलिपालाने (20, उजवीकडे) मिस इंडिया अर्थ किताब जिंकला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.