आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यार्थ्याच्या आईला हेडमास्तर म्हणाला- \'त्यांच्यासोबत चालते, मग माझ्यासोबत का नाही\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडित महिला कर्मचारी - Divya Marathi
पीडित महिला कर्मचारी

ग्वाल्हेर- सेंट पॉल शालेच्या हेडमास्तराने कार्मल कॉन्वेंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी महिलेला आपल्या चेंबरमध्ये बोलवून तिच्याशी अश्लील बोलत छेडछाड केली. एवढ्यावर न थांबता तिला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत तिचे लैंगिग शोषण देखिक करण्याचा प्रयत्न केला. महिला कर्मचारी तयार झाली नाही, तर तिला नोकरीवरून काढून टाकले. याची तक्रार करण्यासाठी महिला पोलिसांकडे पोहोचली, परंतु तिथेही तिची तक्रार लिहून घेतली गेली नाही. शेवटी महिलेने थेट एसपीशी संपर्क केला, त्यानंतर एपीने टीआयला चांगलेच सुनावले आमि महिलेची FIR दाखल करून घेणअयात आली.


असे आहे संपूर्ण प्रकरण...
- फालका बाजारमध्ये कार्मल कॉन्वेंट गर्ल्स स्कूलमध्ये एक क्रिश्चियन महिला कर्मचारी काम करते. तिचा मुलगा मुरारच्या सेंट पॉल स्कूलमध्ये शिकतो. संबंधित महिला कर्मचारी आपल्या मुलाच्या पालक मिटिंगमध्ये नियमित जाते. दोन वर्षांपूर्वी संप्टेंबरमध्ये महिला कर्मचारी याच पीटएमध्ये गेली होती. तेव्हा सेंट पॉल स्कूलचा हेडमास्तर जॉन जेवियर याने हात मिळवण्याच्या बहाण्याने तिला वाईट पद्धतिने टच केले होते.
- यानंतर जेव्हा केव्हा संबंधित कर्मचारी महिला स्कूलमध्ये जात होती, तिच्यासोबत हेडमास्तर जॉन जेवियर अश्लील गप्पा मारत असे आणि तिला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत होता. तिने त्याच्या या वागण्याकडे दुर्लक्ष केले. गेल्या महिन्यात 14 ऑक्टोबरला सेंट पॉलच्या शिक्षकाने कर्माचारी महिलेच्या मुलाला विचारले की, तुझी आई नोकरी करत आहे, की काढून टाकले.


हेडमास्तराने पुन्हा केली चुकीची हरकत...
शिक्षकाच्या त्या प्रश्नावर संबंधित महिला तक्रार करण्यासाठी हेडमास्तर जॉन जेवियरच्या कॅबिनमध्ये गेली. येथे तक्रार ऐकून घेण्या ऐवजी हेडमास्तराने तिला धरून जवळ घेत छेडछाड करण्यास सुरूवात केली. महिलेने विरोध केला, तेव्हा जॉन जेवियर म्हणाला की, तुझे तर फादर जोसफ सोबत रिलेशन आहे मग माझ्यासोबत ठेवायला काय हरकत आहे.  कर्मचारी महिलेने कशीतरी आपली सुटका करून घेत घरी पोहोचली.


महिलेला नोकरीवरून काढून टाकले...
- यानंतर हेडमास्तर जॉन जेवियर याने तिला नोकरीवरून काढून टाकले आणि नंतरही तिला धमकी देऊन रिलेशन बनवण्यासाठी दबाव टाकू लागला. त्रासाला कंटाळून महिलेने बुधवारी रात्री मुरार पोलिस स्टेशन गाठले, परंतु तिची तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही.
- टीआय अजय पवार यांनी सांगितले की, प्रकरण एक महिन्यांपूर्वीचे आहे आणि शाळेत सीसीटीव्ही फुटेज देखिल मिळाले नाही. आधी प्रकरणाची चौकसी करण्यात येईल, त्यानंतर एफआयआर नोंदवण्यात येईल.
- पोलिस आणि स्कूल मॅनेजमेंट मिळालेले आहे असा आरोप कर्मचारी महिलेने केला आहे. बुधवारी रात्री 12 वाजेपर्यंत ती पोलिस ठाण्यात बसून होती, परंतु तिची एफआयआर नोंदवण्यात आली नाही.
- नंतर ही तक्रार एस पी डॉ. आशीष कुमार यांच्याकडे पोहोचली तेव्हा मुरार पोलिसांनी महिलेची एफआयआर दाखल करून घेतली आणि टीआय पवार यांच्या चौकशीची मागणी होत आहे.


हेडमास्तार म्हणाले आरोप खोटे...
- कर्माचारी महिलेने केलेले आरोप खोटे असल्याचे सेंट पॉल स्कूलचे हेडमास्तर जॉन जेवियर यांनी म्हटले आहे. 14 ऑक्टोबरला केवळ दोन मिनिट महिलेशी बोलोलो असल्याचे हेडमास्तराने सांगितले आहे.
- जॉन जेवियरने सांगितले की, महिला त्यांच्याकडे नाही, तर लश्कर चर्चमध्ये काम करते आणि त्यांनी तिला नोकरीवरून का काढले हे मला माहित नाही, परंतु महिला कोणाच्यातरी सांगण्यावरू आरोप करत आहे.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...