आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंभीर आरोप असल्यामुळेच राज्यपाल कमला बेनीवाल यांचा राजीनामा - केंद्र सरकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मिझोरामच्या राज्यपाल कमला बेनीवाल यांच्यावर गंभीर आरोप असल्यामुळेच त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे. यामागे कोणतेही राजकारण झाले नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकाराने आज (गुरुवार) स्पष्ट केले. कॉंग्रेस आणि जदयूने सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नाला केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी उत्तर दिले.

व्यंकय्या नायडू म्हणाले, कमला बेनीवाल यांना पदावरून काढण्याच्या निर्णयामागे कोणतेही राजकारण नाही. राजस्थानातील जमीन घोटाळा आणि सरकारी विमानाचा खासगी कामासाठी वापर केल्याचा बेनीवाल यांच्यावर ठपका आहे. विरोधी पक्षाने बेनीवाल राजीनामाप्रकरणी विचारलेल्या प्रश्नाला असे उत्तर दिले.
दरम्यान, कमला बेनीवाल यांनी मागिल महिन्यात गुजरात येथून मिझोरम येथे बदली करण्‍यात आली होती. कमला बेनीवाल या गुजरातच्या राज्यपाल असताना लोकायुक्ताच्या नियुक्तीवरून तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि बेनीवाल यांच्या वाद निर्माण झाले होते. दोघांमधील मतभेद मीडियात मोठा चर्चेचा विषय बनला होता.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, कमला बेनीवाल यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यास शिल्लक होते दोन महिने...