आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोलकाता- नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली केंद्रात सरकार आल्यास ते गुजरातचे विकास मॉडेल देशभर राबवतील त्यामुळे भांडवलशाही व भांडवलदारांचे वर्चस्व वाढेल शिवाय जातीयवादालाही खतपाणी मिळेल असा आरोप माकप नेते प्रकाश करात यांनी रविवारी केला.मोदींच्या पहिल्या दर्जा पेक्षा आमचा थर्ड ग्रेड बरा असा टोलाही त्यांनी लगावला.
कोलकात्याच्या ब्रिगेड परेड मैदानावर माकपची भव्य जाहिर सभा झाली.या सभेत करात यांच्याव्यतिरिक्त पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुध्ददेव भट्टाचार्यही उपस्थित होते. यावेळी करात यांनी मोदींवर टीकेची झोड उठवली. मोदींच्या गुजरातमध्ये केवळ बड्या उद्योगांनाच फायदा झाला आहे.सामान्य माणसाला कवडीचाही लाभ झालेला नाही. केवळ डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखालील आघाडी सर्मथ धर्मनिरपेक्ष पर्याय देऊ शकते.बिगर काँग्रेस,बिगर भाजपविरोधी धर्मनिरपेक्ष,समविचारी पक्ष विद्यमान संसद अधिवेशनानंतर पर्यायी धोरण जाहिर करणार असल्याचे करात यांनी यावेळी सांगितले.
हो,आम्ही तिसर्या दर्जाचेच
डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखालील तिसरी आघाडी देशाला थर्ड ग्रेड बनवेल अशी बोचरी टीका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केली होती.या टीकेला उत्तर देताना करात म्हणाले, मोदी सत्य तेच सांगत आहेत.आम्ही तिसर्या दर्जाचेच आहोत.शाळेत पहिल्या,दुसर्या वर्गापेक्षा तिसरा वर्ग वरचढच असतो.आम्ही तिसर्या वर्गात आहोत आणि मोदी पहिल्या वर्गात आहेत. मोदींवर जातीयवादाचा आरोप करतानाच काँग्रेसवरही त्यांनी टीका केली.युपीए सरकार दहा वर्षात भ्रष्टाचार रोखण्यास अपयशी ठरली असे करात म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.