आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाहुबलीच्या या मुलीला ऐश्वर्या राय मानते छोटी बहिण, भावी पतीबद्दल आहे या कल्पना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायबरेलीच्या आमदार अदिती सिंह यांचा आज वाढदिवस आहे. - Divya Marathi
रायबरेलीच्या आमदार अदिती सिंह यांचा आज वाढदिवस आहे.
लखनऊ - रायबरेलीचे आमदार आणि बाहुबली नेता अखिलेश प्रताप सिंहची मुलगी अदिती 15 नोव्हेंबरला तिचा बर्थडे सेलिब्रेट करत आहे. यावेळी तिने वडिलांचा राजकीय वारसा सांभाळण्यासाठी फॅशन वर्ल्डच्या करिअरला रामराम ठोकला आहे. या स्पेशल दिवशी तिने तिच्या स्वप्नातील राजकुमाराबद्दलच्या क्वालिटीज आणि बोर्डिंग स्कूलचे अनुभव DivyaMarathi.Com सोबत शेअर केले. 
 
6 वर्षांची असताना आई-वडिलांनी पाठवले बोर्डिंग स्कूलमध्ये 
- माझे शिक्षण मसूरी इंटरनॅशनल बोर्डिंग स्कूलमध्ये झाले. बोर्डिंग स्कूलमध्ये माझा प्रवेश झाला तेव्हा मी फक्त 6 वर्षांची होते. तेव्हा मम्मी-पापाचा मला फार राग आला होता. मात्र शाळेत मी तो कधीही चेहऱ्यावर येऊ दिला नाही. 
- शाळेत असताना मी फार लाजाळू आणि सरळ मुलगी होते. मात्र घरी आल्यानंतर माझा सर्व राग मी माझ्या कझिन्सवर काढत होते. त्यामुळेच कदाचित माझ्या फॅमिलीमध्ये माझी इमेज दबंग गर्लची झाली आहे. 
 
ऐश्वर्या रायने म्हटले होते - तु माझ्या छोट्या बहिणीसारखी 
- अदिती सांगते, बॉलिवूडमध्ये ऐश्वर्या राय माझी फेव्हरेट आहे. तिच्या सारखे सौंदर्य दुसरे नाही. एकदा मुंबईला फिरायला गेले असताना मी वडिलांना सांगितले, की मला ऐश्वर्याला भेटायचे आहे. तेव्हा 'ताल'ची शुटिंग सुरु होती.
- वडिल फोनवर कोणासोबत तरी बोलले आणि अर्ध्या तासात शूटिंग स्पॉटवरुन फोन आला तुम्ही येथे येऊन जा. 
- मी ऐश्वर्याला भेटायला गेले. ती अतिशय सुंदर दिसत होती. आम्ही जवळपास 25 मिनिट बोलत होतो. मी तिच्या सौंदर्याबद्दल खूप-खूप बोलत होते, तेव्हा ती म्हणाली- तु देखील माझी छोटी बहिण आहेस, तु देखील खूप सुंदर आहे. 
- ऐश्वर्याशिवाय अदितीला राजपाल यादवची अॅक्टिंग आवडते. अदितीच्या आवडत्या चित्रपटांमध्ये डीडीएलजे, हम आपके है कौन, भूलभुलय्या, मालामाल विकली, ताल आणि डर आहे. 
अदिती 30 वर्षांची झाली असून अजून सिंगल आहे. लग्नाच्या प्लॅनबद्दल विचारले असता ती म्हणाली, त्याबद्दलचा माझा काही प्लॅन नाही. सध्या मी माझ्या कामावर लक्ष दिले आहे. लग्नाचा विचार मम्मी-पापा करतील. माझ्यावर कोणतेच बंधन कधी नव्हते. मात्र लग्न हे आई-वडिलांच्या इच्छेनेच करणार आहे. 
- अदितीला तिच्या स्वप्नातील राजकुमाराबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली, तो संस्कारी असला पाहिजे. भविष्यात काय करायचे आहे, त्याबद्दलचे त्याचे विचार स्पष्ट असले पाहिजे. त्याची स्वतःची वेगळी ओळख असणे सर्वात महत्त्वाचे आहे. 

यूएसमधून यासाठी भारतात आली परत 
- अदितीने सांगितले, मी यूएसच्या ड्यूक यूनिव्हर्सिटीमधून मॅनेजमेंटमध्ये मास्टर डिग्री मिळवली आहे. शिक्षणाच्या काळात मी तेथील फॅशन हाऊसमध्ये 4 महिने अनपेड इंटर्नशिप केली होती. तेव्हा मी हाय प्रोफाइल वातावरणात राहिले होते. 
- दरम्यानच्या काळात मी रायबरेलीत आले होते. बऱ्याच काळानंतर घरी आले होते. शहरात फिरले तेव्हा येथील गरीब वस्त्या पाहिल्या. एकदा घराबाहेर एक लहान मुलगा भेटला. त्याची परिस्थिती अतिशय हालाखीची दिसत होती. त्याला पाहून विचार केला की मी विदेशात काय करत आहे? फक्त मॉडेल्सच्या मागे - पुढे फिरणे हेच माझे आयुष्य आहे का? मला माझ्या समाजासाठी काही करायचे आहे. तेव्हापासून मी भारतातच राहाण्याचे नक्की केले. मी माझ्या वडिलांसारखे समाजकारण आणि राजकारण करण्याचा निर्णय घेतला. 

राहुल गांधींना आवडली होती आयडिया
अदिती आता रायबरेलीच्या आमदार आहेत. आमदार अदिती सिंह या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संपर्कात असतात. त्यांनी सांगितले, की मी राहुलजींना अनेकदा भेटले आहे. त्यांच्या भेटीनंतर लक्षात आले की ते तरुण नेतृत्वाला प्रोत्साहन देतात. एकदा विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी मला विचारले होते, इलेक्शनची तयारी सुरु आहे, याशिवाय आणखी काय करण्याची इच्छा आहे? मी त्यांच्यासोबत गावात शांतता उद्यान तयार करण्याची आयडिया शेअर केली. ती त्यांना फार आवडली होती. त्यावर त्यांनी काही सूचनाही केल्या होत्या. 
 
 
पुढील स्लाइडला क्लिक करुन पाहा, फोटो.. 
बातम्या आणखी आहेत...