आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्‍तीसगडचे माजी मुख्‍यमंत्री अजीत जोगींचे पुत्र आमदार अमित यांना कॉंग्रेसमधून काढले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमित जोशी - Divya Marathi
अमित जोशी
रायपूर - छत्‍तीसगडचे माजी मुखमंत्री अजित जोगी यांचे पुत्र अमित जोगी यांना कॉंग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्‍यात आले आहे. अंतागड विधानसभा मतदार संघात झालेल्‍या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्‍या उमेदवाराची उमेदवारी मागे घेण्‍यासाठी त्‍यांनी आर्थिक देवाण-घेवाण केल्‍याचा आरोप आहे. अमित हे मरवाही विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आहेत.
पक्षाच्‍या वरिष्‍ठांना दिले जाणार पुरावे
- छत्‍तीसगडच्‍या कॉंग्रेस नेत्‍यांची या संदर्भात बैठक सुरू असून, पक्षाचे राज्‍याध्‍यक्ष भुपेश बघेल आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते टी.एस. सिंह देव दिल्लीला जाणार आहेत. त्‍या ठिकाणी ते पक्षांच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांना या बाबत पुराव्‍याच्‍या टेप देणार आहेत.
- पक्षांच्‍या वरिष्‍ठांकडून आता अजीत जोगी यांच्‍यावरही कारवाई केली जाईल, असे सांगितले जात आहे. यामध्‍ये त्‍यांचाही आवाज असल्‍याची चर्चा आहे.
अजीत सोनिया गांधींचे निकटवर्तीय
- अमित जोगीवर छत्‍तीसगड कॉंग्रेस समितीने कारवाई केली आहे.
- पंरतु माजी मुख्‍यमंत्री अजित जोगी अखिल भारतीय कॉंग्रस समितीचे सदस्‍य आहेत. त्‍यामुळे त्‍यांच्‍यावर कारवाई करण्‍याचा अधिकार दिल्‍लीच्‍या वरिष्‍ठांनाच आहे.
- अजीत हे सोनिया गांधी यांचे निक‍टवर्तीय आहेत. त्‍यामुळे त्‍यांच्‍यावर कारवाई होईल की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे.
काय आहे प्रकरण
- अंतागड विधानसभा मतदार संघात झालेल्‍या पोटनिवडणुकीत नामांकन मागे घ्‍यावे म्‍हणून भाजपचे रमन सिंहचे जावाई पुनित गुप्ता यांच्‍यासोबत त्‍यांनी आर्थिक देवाण-घेवाण केल्‍याचा आरोप आहे.
- यानंतर कॉंग्रेस उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
- ऑडिओ टेपमध्‍ये जोगींचे पुत्र अमित आणि रमन यांचे जावाई पुनीत यांच्‍या शिवाय मंतूराम पवार, जोगीचे निकटवर्तीय फिरोज सिद्दीकी आणि अमीन मेमन यांच्‍यातील संभाषण रेकॉर्ड आहे.
कॉंग्रेस नेत्‍यांनी काय म्‍हटले...
आमदार अमित जोगी यांनी आपल्‍या कृत्‍याने पक्षाची प्रतिमा मलीन केली आहे. त्‍यामुळे त्‍यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्‍यात आले आहे. आता हे पाहावे लागेल की भाजप रमन सिंह यांच्‍यावर काय कारवाई करते”
- भूपेश बघेल, छत्‍तीसगड कॉंग्रेस समिती अध्‍यक्ष

पुढील स्लाइडवर पाहा फोटोज....
(सर्व फोटो; भूपेश केशरवानी)