आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाहुबली आमदाराचे आलीशान हॉटेल, फिरतात मर्सडीझ आणि बग्गीतून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा येथील स्थित अनंत सिंह यांचे आलीशान हॉटेल - Divya Marathi
पाटणा येथील स्थित अनंत सिंह यांचे आलीशान हॉटेल
पाटणा - 'छोटे सरकार' नावाने प्रसिद्ध असलेले बिहारचे बाहुबली जेडीयू आमदार अनंत सिंह यांच्या अटकेने राजकारणात खळबळ माजली आहे. मर्सिडीझ, बग्गीपासून आलीशान हॉटेलचे मालक असलेले अनंत सिंह यांना अपहरण आणि हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. हत्या, अपहरण याबरोबर त्यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता जमवल्याप्रकरणीही आरोप झाले आहेत.

पॉश भागात हॉटेल
अनंत सिंह यांचे पाटण्याच्या अत्याधुनिक अशा पाटलीपुत्र कॉलनीमध्ये हॉटेल आहे. 2013 मध्ये अनंत सिंह यांच्यावर हॉटेलसमोर अतिक्रमण केल्याचा आरोपही लागला होता. पण याप्रकरणी गोंधळ झाल्यानंतर त्यांनी जमीन रिकामी केली होती.

हौशेखातर...
अनंत सिंह यांच्याकडे अनेक लक्झरी गाड्या आहेत. पण त्याच्या मर्सिडीझ आणि बग्गीवरून झालेले वाद अधिक चर्चेत आलेले आहेत. अनंत सिंह मर्सिडीझ चालवतात पण केवळ शौक म्हणून त्यांनी खास दिल्लीहून बग्गी मागवली आहे. ते मर्सिडीज ऐवजी बग्गीमधून विधानसभेत गेले होते. त्यांना जेव्हा याबाबत विचारण्यात आले तेव्हा त्यांनी हा पेट्रोल बचतीचा मार्ग असल्याचे म्हटले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा अनंत सिंह यांचे हॉटेल, बग्गी आणि मर्सिडीझ...
बातम्या आणखी आहेत...