आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mla Engineer Rashid Threatens Bjp Leader To Handover Him To Terrorist Organization Lashka

\'दहशतवाद्यांकडून अपहरण करेल\' आमदार रशीद यांची भाजप नेत्यांना धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- दक्षिण काश्मीरमधील पुलवामामध्ये गुरुवारी अपक्ष आमदार रशीद यांनी भाजप आमदारांना अपहरणाची धमकी दिली. एका धरणे आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याविरुद्ध बॅनर हटवल्यावरून आमदार इंजिनिअर रशीद व भाजप कार्यकर्त्यांमध्ये जुंपली. दोन गटात‍ धक्काबुक्कीही झाली. दरम्यान भाजयुमोचे कार्यकर्ते जखमी झाले.

दहशतवाद्यांना सांगून तुमचे अपहरण करेल, या शब्दात आमदार रशीद यांनी भाजप नेत्यांना धमकी दिली आहे. दरम्यान, रशीद यांनी काही महिन्यांपूर्वी गोमांस बंदीला कडाडून विरोध केला होता. यानंतर आमदार रशीद यांनी दिल्लीत भाजप आमदारांवर शाई फेकली होती.

मिळालेली माहिती अशी की, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरक्षा रक्षकांनी आमदार इंजिनियर रशीद यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या गोळीबारात परवेझ अहमद या युवकाचा मृत्यू झाला होता. आमदार रशिद यांच्या नेतृत्त्वाखाली त्यांच्या समर्थकांनी या घटनेच्या निषेधार्थ धरणे आंदोलन केले. आंदोलकांच्या हातात भले मोठे बॅनर होते. त्यावर 'मोदीजी स्टॉप टेरराइजिंग मु्स्लिम्स' (मोदीजी मुसलमानांना भयभीत करू नका) असा उल्लेख होता. पोलिसांनी आदोलकांकडून बॅनर हिस्काउन घेतले. त्यामुळे आमदार रशीद संतापले होते. त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.