आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आमदाराने मुलासोबत दिली बारावीची परीक्षा, तोंड झाकून जात होते सेंटरवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केथल- गुहलाचे आमदार कुलवंत बाजीगर यांनी आज चक्‍क त्‍यांच्‍या मुलासोबत इयत्‍ता 12 वीची परीक्षेतील शेवटचा पेपर दिला. त्‍यांनी 19 वर्षांआधी म्‍हणजे 1997 मध्‍ये दहावीची परीक्षा दिली होती. त्‍यानंतर आता हरियाणा ओपन स्कूलिंगमधून ते बारावी पूर्ण करत आहेत.
मुलांसोबत केली परीक्षेची तयारी....
- आमदार कुलवंत बाजीगर यांचा मोठा मुलगा यंदा इयत्‍ता बारावीची परीक्षा देत आहे.
- या आमदाराचा लहान मुलगा इयत्‍ता अकराव्‍या वर्गात आहे.
- आमदार म्‍हणतात की, माझ्या मुलांसाेबतच परीक्षेची तयारी केली, त्‍यांची मदतही केली.
- या आमदाराने केथलच्‍या पट्टी अफगान येथील राजकीय वरिष्ठ माध्यमिक विद्यालयात बारावीचा शेवटचा पेपर सोडवला.
लपून-छपून येत परीक्षा केंद्रावर....
- आमदार बाजीगर यांनी सांगितले, लपून- छपून ते पेपर सोडवायला परीक्षा केंद्रावर येत असत.
- कुणी ओळखू नये म्‍हणून, तोंड बांधून ते परीक्षा केंद्रावर पोहोचत होते.
- 21 एप्रिलला शेवटच्‍या पेपरला माध्‍यमांनी त्‍यांना ओळखले.
- या आमदारांनी सांगितले की, बारावी पास होणे एवढाच त्‍यांचा उद्देश नाही त्‍यांना पुढे बीए आणि लॉ ची पदवी मिळवायची आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, या आमदाराने कार्यकर्त्‍याला घातला होता बुट.....