आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MLA Prabhu Chavan Caught Zooming In On Priyankas Photo In Assembly

विधानसभेत भाजप आमदार मोबाइलवर पाहात होते प्रियंका गांधीचा फोटो, काँग्रेस संतप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेळगाव - कर्नाटक विधानसभेत मंगळवारी ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर चर्चा सुरु होती. तेव्हा भारतीय जनता पक्षाचे एक आमदार स्मार्टफोनवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची कन्या प्रियंका गांधी यांचे फोटो पाहात होते. हे दृष्य एका खासगी वृत्तवाहिनीच्या कॅमेराने टिपले. हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर भाजपवर सर्वबाजूने टीकेची झोड उठली असून त्यांना त्यांच्या उत्तराने विरोधकांचे समाधन झालेले नाही.
सभागृहात गंभीर विषयावर चर्चा सुरु असताना भाजप आमदार प्रभू चव्हाण हातातील स्मार्टफोनवर प्रियंका गांधी यांच्यासह काही राजकीय नेत्यांचे फोटो पाहात होते. त्यात नरेंद्र मोदींचेही फोटो होते. मात्र, प्रियंका गांधी यांचा फोटो स्क्रिनवर आला तेव्हा चव्हाण काही क्षण तिथेच थांबले. त्यांनी तो फोटो झुम केला आणि अधिक जवळून पाहिला. टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले, की फोटो कॅप्शन वाचण्यासाठी फोटो झुम केला होता.
भाजप सदस्यांचे सभागृहात कँडी क्रश
चव्हाण फोटो पाहात असतानाच भाजपचे आणखी एक सदस्य मोबाइलवर कँडी क्रश गेम खेळत होते. काँग्रेसने या दोन्ही प्रकारांचा जोरदार निषेध करत तिखट प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचे नेते शहजाद पुनावाला यांनी हे अश्लील कृत्य असल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केला आहे.
भाजप नेते जगदीश शेट्टर म्हणाले, माझ्या माहितीनुसार त्यात अश्लील असे काही नव्हते. चव्हाण त्यांच्या कुटुंबियांची छायाचित्रे पाहात होते. आमच्या पक्षाने सभागृहात मोबाइल फोनवर बंदी आणण्याची मागणी केली आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आणखी छायाचित्रे...