आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कट्टर हिंदुत्वासाठी ओळखला जातो राजघराण्यातील हा नेता, खाताे फक्त मातीच्या चुलीवरील अन्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रघुराज प्रताप सिंह ऊर्फ राजा भैया आमदार आहेत. - Divya Marathi
रघुराज प्रताप सिंह ऊर्फ राजा भैया आमदार आहेत.
लखनऊ - यूपीच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण करणारे रघुराज प्रतापसिंह ऊर्फ राजा भैय्याने 31 ऑक्टोबर रोजी बर्थडे सेलिब्रेट केला. या खास ऑकेजनवर DivyaMarathi.comने राजाभैयांशी बातचीत केली. त्यांनी आपल्या बालपणापासून ते आतापर्यंतच्या अनेक आठवणी शेअर केल्या.
 
कोण आहेत राजा भैया?
- भदरी रियासतचे राजकुमार रघुराज प्रताप सिंह "राजा भैया" यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1967 रोजी प्रतापगडच्या कुंडात झाला होता. या परिसरातून ते आमदारही आहेत. 
- अखिलेश सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या राजा भैया यांचे वडील राजा उदय प्रताप सिंह आपल्या कट्टर हिंदू प्रतिमेसाठी ओळखले जातात. त्यांचे आजोबा राजा बजरंग बहादूर सिंह हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राहिलेले आहेत.
- राजा भैयांचे प्राथमिक शिक्षण अलाहाबादच्या महाप्रभू बाल विद्यालयातून झाले. भारत स्काउट अँड गाइड हायस्कूल ममफोर्डगंज, अलाहाबादमधून त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षण घेतले.
- त्यांनी लखनऊ विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. याच विद्यापीठातून त्यांनी मिलिटरी सायन्स आणि इंडियन मेडिव्हल हिस्ट्रीमध्ये ग्रॅज्यूएशनची डिग्री घेतली आहे.
 
मातीच्या चुलीवरील अन्नच ग्रहण करतात राजा भैया
- या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी 14 कोटींची संपत्ती घोषित केली. कधी बीएमडब्ल्यू, तर कधी मर्सिडीझसोबत फोटो क्लिक करणाऱ्या राजा भैयांनी आयुष्यातील काही आठवणी शेअर केल्या.
- राजा भैया म्हणाले, मी येथील बंगल्यात राहो अथवा सरकारी निवासात, माझे जेवण फक्त मातीच्या चुलीवरच शिजते. मला फक्त त्यावरीलच जेवणाची चव आवडते.
- त्यांचे जिवलग डॉ. कैलाशनाथ ओझा म्हणाले, त्यांनी लखनऊच्या सरकारी निवासात मातीची चूल बनवली आहे. त्यांचे संपूर्ण जेवण त्यावरच शिजते.
- राजा भैया नॉनव्हेजचेही शौकीन आहेत. यासाठी स्पेशल मातीची भांडी असतात, जी मातीच्या चुलीवर वापरली जातात.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, राजा भैयाशी निगडित असे काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...