प्रतापगड- कुंडाचे आमदार रघुराज प्रताप उर्फ राजा भैय्या यांचे वडिल उदयप्रताप सिंह आणि अन्य 5 जणांना रविवारी नजरकैदेत ठेवण्यात आले. ही कारवाई रविवारी शेखपुर आशिक येथे होणारा एक कार्यक्रम रोखण्यासाठी करण्यात आली. रात्री उशिरापर्यत त्यांना घरातच नजरकैदत ठेवण्यात आले होते. यावेळी स्थानिक पोलिसही उपस्थितही होते.
Divyamarathi.com ने याबाबत राजा भैय्या यांच्याशी संवाद साधला.
5 वर्षात दुप्पट झाली संपत्ती
- राजा भैय्या हे 1993 पासून कुंडाचे आमदार आहे. त्यांना या भागात काही जण तूफान सिंहही म्हणतात.
- 2007 मध्ये त्यांच्याकडे 2.73 कोटीची संपत्ती होती. ती आता 7.11 कोटी झाली आहे. राजा भैय्या यांच्याकडे 2017 मध्ये 14 कोटींची संपत्ती आहे. त्यात त्यांची पत्नी भानवी आणि 4 मुलांचे हिस्से आहेत.
भानवी आहे अर्ध्या संपत्तीची मालकीण, स्वत:कडे असते पिस्तूल
- राजा भैय्या यांनी आपली अर्ध्याहून अधिक संपत्ती पत्नीच्या नावे दाखवली आहे. त्यांच्या खात्यात 6 कोटीची संपत्ती आहे. तर त्यांची पत्नी 7.2 कोटींची मालकिण आहे.
- भानवी यांच्याकडे 1.2 कोटींचे सोने आहे. याशिवाय 2 लाखांचे 3 पिस्तूल आणि रायफल आहे.
- त्यांची सारंग एंटरप्रायझेसमध्ये 85 टक्के पार्टनरशिप आहे. याशिवाय श्रीदा प्रॉपर्टीजमध्ये त्यांची 90 टक्के भागीदारी आहे. या दोन्ही कंपन्या लखनऊमधील आहेत.
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती