आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा भर सभेत आमदारच हुंदके देत रडतात, म्हणाले दागिने-जमीन विकून लढलो निवडणूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- भाषण देताना भावूक होऊन रडताना आमदार नवीन जयस्वाल)
रांची- झारखंडमधील हटिया विधानसभा मतदार संघाचे आमदार नवीन जयस्वाल बुधवारी (5 नोव्हेंबर) एका जाहीर सभेत अचानक भावूक झाले आणि व्यासपीठावरच हुंदके देत रडायला लागले. आपल्या नेत्याला रडताना पाहून उपस्थित लोकही भावूक झाले होते.
नवीन जायस्वाल हे हटिया विधानसभा मतदार संघातून ऑल झारखंड स्टूडेंट्स यूनियनचे (आजसू) आमदार आहेत. यंदा निवडणुकीपूर्वी आजसू आणि भाजपमध्ये युती झाल्याने ही जागा भाजपच्या कोट्यात गेली आहे. त्यामुळे आमदार नवीन जायस्वाल यांची गोची झाली आहे. या पार्श्वभूमीवर काय करावे, यासाठी ही जनसभा आयो‍जित करण्यात आली होती.

हटिया येथील डिबडीह पुल मैदानात आयोजित जनसभेत आमदार नवीन जायस्वाल आपल्या समर्थकांना संबोधित करताना म्हणाले, त्यांनी आजसू पक्षाच्या विकास आणि प्रचारासाठी आपण संपूर्ण जीवन समर्पित केले आहे. पक्षाला मोठे करण्यात कोणताच कसूर ठेवलेला नाही. समर्पण आणि सेवा भावनेचे मला हे फळ मिळाले. तसेच अशा प्रकारचे छळ कपटाचे राजकारण मला कधीच करता आले नाही. मी पूर्णपणे अनभिज्ञ होतो, असेही आमदार जायस्वाल म्हटले.

नवीन जयसवाल म्हणाले, दागिने आणि जमीन विकून हटिया येथून पोटनिवडणूक लढविली होती. जनतेने विजयही मिळवून दिला. हे सांगत असताना जयस्वाल यांना अचानक रडू कोसळले. ते हुंदके देत रडायला लागले. दुसरीकडे, उपस्थित समर्थकही भावूक झाले होते.

पक्षाने उमेदवारी दिली नसली तरी आपण हटिया विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याचे नवीन जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे. जनतेने यंदाही भरघोस मतांनी विजयी करावे, असेही आवाहन नवीन जयस्वाल यांनी केले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, भर सभेत रडणार्‍या समर्थकांची छायाचित्रे...