कोणताही मोबाइल चार्ज करण्यासाठी साधारणपणे 20 मिनिटे लागतात. परंतू नॅशनल केमिकल लॅबरोटरी, साएसआयआर, पुणे येथे एक असे कॅपॅसिटर तयार करण्यात आला आहे ज्याच्या मदतीने 10 सेकंदात मोबाइल चार्ज करता येतो. या सोबतच व्हर्जिनिया टेक नावाने ओळखल्या जाणा-या प्रसिद्घ व्हर्जिनिया पॉलिटेक्निक आणि स्टेट युनिर्वसिटीतील संशोधकानी साखरेवर मोबाइल बॅटरी चार्ज करण्याच्या शोध लावला आहे. एवढेच नाही तर एका भारतीय वंशीय 18वर्षीय अमेरिकन तरुणीदेखील 20 सेकंदात मोबाइल चार्ज करणारे उपकरण शोधून काढले आहे.
प्रयोग 50 टक्के यशस्वी
पटियालामधील पीयू येथे आयकॉनसैटमध्ये काही फिच्यूर टेक्नोलॉजीज सादर करण्यात आल्या. यात 10 सेकंदात मोबाइल चार्ज करणा-या कॅपॅसिटरची सर्वात जास्त चर्चा झाली. विशेष बाब म्हणजे हे कॅपॅसिटर लिंबू आणि ऊसापासून तयार करण्यात आले आहे. सध्या तरी 10 सेंकदात 50 टक्केपेक्षा जास्त बॅटरी चार्ज करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे.
काय आहे यात
1 हे सुपर कॅपॅसिटर सामान्य बॅटरी सारखेच दिसते. यालाही मोबाइल प्रमाणेच प्लगला कनेक्ट करून चार्ज करता येते.
2 कोणत्याही बॅटरीच्या तुलनेने 10 पट्ट लवकर हे कॅपॅसिटर चार्ज होते. हे कॅपॅसिटर चार्ज झाले. की लगेचच मोबाइलची बॅटरी चार्ज करते.
3- हे कॅपॅसिटर मोबाइलला कनेक्ट करताच 10 सेकंदात बॅटरी चार्ज होते.
अशाप्रकारे मिळते इंस्टट चार्जिंग
अमेरिकेतही असे सुपर कॅपॅसिटर तयार करण्यात आले आहेत मात्र त्यात महागड्या कार्बनचा वापर होत असल्याचे, डॉ. ओगले यांनी सांगितले. परंतू पुण्याच्या प्रयोगशाळेने हे कॅपॅसिटर लिंबू आणि ऊसाच्या चोथ्यापासून तयार केले आहे. हे कॅपॅसिटर सेंद्रिय पदार्थापासून तयार करण्यात आल्याने हे पर्यावरणाला हानी पोहचवणार नाही. यासाठी त्यांनी पेटेंट केले असून इनव्हटरची बॅटरी चार्ज करणारे कॅपॅसिटर तयार करण्याचा ते प्रयत्न करत आहेत.
कार्बन क्लोथ
होगी पानी प्रोय ओगले आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी एक कार्बन क्लोथ तयार केला आहे. ज्या प्रमाणे चुबंक लोहाला आकर्षूण घेते त्याचप्रमाणे हा कार्बन कोल्थ पाण्यातून डाय पॉल्यूशन आणि तेल वेगळे करतो. लिंबू आशोकाची पाने आणि ऊसापासून हे कार्बन क्लोथ तयार केले आहे. याच्या कडांवर मॅग्नेटिक आर्यन ऑक्साइडचा थर लावण्यात आला आहे. जाळ्यासारखे हा कार्बन क्लोथ पाण्यावर टाकला की पाण्यातील घाण तो बाजूला करतो.
साखरेपासून चार्ज होणा-या मोबाइल बॅटरीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी पिढील स्लाइडवर क्लिक करा...