आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीमंतांऐवजी सामान्य व्यक्ती पहिल्यांदाच सर्वाेच्चपदी: मोदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- एम. व्यंकय्या नायडू शुक्रवारी देशाचे १३ वे उपराष्ट्रपती झाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना शपथ दिली. स्वतंत्र भारतात जन्म झालेले नायडू पहिले उपराष्ट्रपती आहेत. राज्यसभेत सलग अनेक वर्षे सदस्य राहिलेले नायडू एकमेव उपराष्ट्रपती आहेत. उपराष्ट्रपती या नात्याने नायडू राज्यसभेतचे सभापतीही असतील. शपथ घेतल्यानंतर काही वेळाने ते संसदेत आले आणि राज्यसभेच्या कामकाजाचे संचालन केले.

पहिल्या दिवशी भाजपशिवाय काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी नायडू यांच्या स्वागताप्रित्यर्थ भाषण केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, नायडू शेतकऱ्याचे पूत्र आहे. श्रीमंत वर्गातून नव्हे तर सर्व सामान्य लोकांतील व्यक्ती सर्वाेच्च पदावर पोहोचण्याची ही पहिली वेळ आहे. त्याच्या उत्तरादाखल काँग्रेसचे गुलाम नबी आझाद यांनी मोतीलाल नेहरू व महात्मा गांधी यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, देशाचे स्वातंत्र्य व  लोकशाहीचा पाया रचण्यात श्रीमंत व कोट्यधीश लोकांचेही योगदान विसरता येणार नाही.नायडू उपराष्ट्रपती होणारे भाजपचे दुसरे नेते आहेत. भाजपचे भैरवसिंह शेखावत या पदावर होते. नायडू यांनी हमीद अन्सारी यांची जागा घेतली.

दरम्यान, नायडू अनेक वर्षे राज्यसभा सदस्य राहिलेले आहेत. त्यांना प्रत्येक बाब माहित आहे. ते शेतकऱ्याचे पूत्र आहेत. गाव, गरीब व शेतकरी, सर्वांचा बारकाईने अभ्यास केला आहे. पहिल्यांदाच सर्वाेच्च पदावर श्रीमंत नव्हे तर सर्वसामान्यांतील व्यक्ती पोहोचला आहे. ते शब्दांशी खेळत नाहीत. वकिलांतून एखादा न्यायाधीश झाल्यावर बार काउंसिलला काहीसे अवघडल्यासारखे वाटते. तसेच ते सदस्यांतून उपराष्ट्रपती झाले आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले. 

‘आम्ही चांगले विद्यार्थी ’
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या राजकीय कारकीर्दीचे वर्तुळ पूर्ण झाले आहे असे वाटते. कारण त्यांनी विद्यार्थी नेता म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली होती. आता ते ‘वर्गा’चे प्रमुख झाले आहेत. परंतु आम्ही (खासदार) चांगले विद्यार्थी आहाेत. आमच्यामुळे त्यांचा रक्तदाबही वाढणार नाही याची खात्री देऊ इच्छितो, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले. त्याबरोबर राज्यसभेत हशा पिकला.  निमित्त होते नूतन उपराष्ट्रपती नायडू यांच्या स्वागतपर कार्यक्रमाचे. त्यात खासदारांनी मते मांडली.
बातम्या आणखी आहेत...