आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

60 टन वजनाचे रणगाडेही विनासायास धावू शकतील, आसाम-अरुणाचल महासेतू राष्ट्राला अर्पण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सादिया (आसाम) - आसाम आणि चीनलगत असलेल्या अरुणाचलला जोडणारा ९.१५ किमी लांबीचा देशातील सर्वांत मोठा पूल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राष्ट्राला अर्पण केला. भाजप सरकारला केंद्रात ३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदींनी या पुलाचे उद्घाटन केले. यास जगप्रसिद्ध गायक भूपेन हजारिका यांचे नाव देण्यात आले आहे.
 
काही चांगले घडेलच : गुवाहाटीमध्ये बोलताना मोदी म्हणाले, नैराश्य संपून आता लोकांमध्ये आशा जागवल्या आहेत... काहीतरी चांगले घडेल. दिलेली वचने कोणत्याही स्थितीत पाळली जातील.
 
ढोला-सादियापूल हा आसाम-अरुणाचल प्रदेशच्या विकासात भर घालणार आहे त्याचबरोबर ईशान्येकडील प्रदेशाच्या अर्थक्रांतीचा पाया ठरेल. त्यातूनच भारताचे आर्थिक पातळीवरील विकसित देश होण्याचे स्वप्नही साकार होईल, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केला. सरकारच्या तीन वर्ष पूर्तीच्या निमित्ताने देशातील सर्वाधिक लांबीच्या पुलाचा राष्ट्रार्पण सोहळा पार पडला. त्याप्रसंगी मोदी बोलत होते.
 
कोणत्याही देशाला कायमचे विकसित व्हायचे असल्यास प्रारंभी पायाभूत सुविधा असल्या पाहिजेत. पायाभूत सुविधांच्या दोन पातळ्या आहेत. त्यात भौतिक साधने आणि सामाजिकदृष्ट्या आवश्यक सुविधाही गरजेच्या असतात, असे मोदी म्हणाले. पुलामुळे आसाममधील अद्रक उत्पादकांना मोठ्या बाजारपेठेची दारे खुली होतील. पूर्वोत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना या पुलामुळे फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने अद्रक शेती केल्यास त्याचे अधिक फायदे पदरात पाडून घेता येऊ शकतील.

या पुलामुळे सामान्यांचा ७-८ तासांचा वेळ, पैसा वाचणार आहे. दररोज डिझेलच्या १० लाख रुपयांच्या खर्चाचीदेखील बचत होईल. ढोला-सादिया पूल आसामचे सुपुत्र गायक भूपेन हजारिका यांच्या नावाने आेळखला जाईल, असे मोदी यांनी सांगितले. दरम्यान, हजार ५६ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला हा पूल बांद्रा-वरळी सी लिंकपेक्षा ३.५५ किलोमीटर जास्त लांबीचा आहे. त्याची लांबी ९.१५ किलोमीटर आहे.

गुवाहाटी एआयआयएमएसचा आरंभ : पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (एआयआयएमएस) इमारतीचा कोनशिला समारंभ पार पडला. कामरूप जिल्ह्यातील छांगसारीमध्ये ते सुरू होणार आहे.
 
शेतकऱ्यांसाठी संपदा योजना : भारतीयकृषी संशोधन संस्थेच्या कोनशिला समारंभ प्रसंगी मोदी यांनी नव्या योजनेची घोषणा केली. संपदा अर्थात स्किम फॉर अॅग्रो मरिन प्रोसेसिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ अॅग्रो प्रोसेसिंग क्लस्टर्स देशाला समर्पित केले. ग्रामीण भारतात रोजगार संपन्नतेचे ध्येय पूर्ण करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, अरुणाचलला जोडणारा ९.१५ किमी लांबीचा देशातील सर्वांत मोठा पूल
 
बातम्या आणखी आहेत...