फोटो : हरियाणाच्या सिरसामध्ये निवडणूक प्रचारसभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी.
सिरसा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील सिरसा येथे प्रचारसभेत राज्याच्या विकासासाठी एक स्वतंत्र मॉडेल तयार करण्याचे आश्वासन दिले. राज्यात भाजपला पूर्ण बहुमताने निवडून दिल्यास गेल्या 15 वर्षांत जी कामे झाली नाहीत, ती पूर्ण केली जातील. मोदींच्या आधी सोनिया आणि हरियाणाचे मुख्यमंत्री बी.एस.हुड्डा यांनी तोशममध्ये एक प्रचारसभा घेतली. त्यांनी मोदी आणि चौटालांवर जोरदार हल्ला चढवला.
मोदींची काँग्रेसवर टीका
पंतप्रधान म्हणाले की, आता भ्रष्टाचाराने हद्द पार केली आहे. भ्रष्टाचारी नेत्यांच्या कुटुंबीयांनी
आपली घरे भरून घेतली. त्यांच्या पाठोपाठ मित्र आणि नातेवाईकही मागे नाहीत. पण आता हरियाणातील लूट सहन केली जाणार नाही. हरियाणात गेल्या 15 वर्षांत जो विकास रखडला आहे, तो भाजपचे सरकार पाच वर्षात करून दाखवेल असे आश्वासन मोदींनी दिले.
हरियाणाचे कौतुक
मोदींनी रॅलीमध्ये राज्याचे भरपूर कौतुक केले. तसेच भावलनिक संबंधही जोडला. हरियाणाचे जवान देशाची रक्षा करत आहेत, तर शेतकरी देशाचे अन्नदाते आहेत. तुमच्यावर संपूर्ण देशाला गर्व आहे. याच हरियणामध्ये मी राजकीय जीवनाला सुरुवात केली आहे. हे कर्ज विकासाच्या माध्यमातून फेडायचे असल्याचे मोदी म्हणाले.
विकासाचा मुद्दा
मोदींनी हरियाणा आणि सिरसा येथील विकासाचा मुद्दाही उचलला. ते म्हणाले, मला हरियाणाच्या तरुणांना रोजगार मिळवून द्यायचा आहे. तरुणांसाठी स्किल डेव्हलपमेंट असायला हवे कारण त्याने रोजगाराच्या संधी वाढतील. सिरसा एका बेटाप्रमाणे आहे. ते वेगळे पडल्यासारखे बाजुला राहिले आहे. त्यामुळे मला सिरसाचे भाग्य बदलायचे आहे.