आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिक्समध्ये 'लष्कर - जैश'चा उल्लेख नाही करु शकला भारत, चीनने नाही होऊ दिले एकमत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिक्स परिषदेत नरेंद्र मोदी आणि चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग. - Divya Marathi
ब्रिक्स परिषदेत नरेंद्र मोदी आणि चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग.
पणजी (गोवा) - 8th ब्रिक्स परिषदेचा रविवारी समारोप झाला. दोन दिवस चाललेल्या परिषदेत भारताने दहशतवादावर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचे नाव न घेता या देशावर हल्ला चढवला. मात्र चीनमुळे ब्रिक्स राष्ट्राच्या संयुक्त जाहीरनाम्यात सीमेवरील दहशतवाद, लष्कर-ए-तोएबा, जैश-ए-मोहम्मद सारख्या पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचा उल्लेख करण्यावर एकमत होऊ शकले नाही.
ब्रिक्स देशांनी केला उरी हल्ल्याचा निषेध
- भारताचे परराष्ट्र सचिव अमर सिन्हा म्हणाले,'संयुक्त जाहीरनाम्यात ब्रिक्स देशांचे लष्कर-ए-तोएबा, जैश-ए-मोहम्मद सारख्या पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचा उल्लेख करण्यावर एकमत होऊ शकले नाही.'
- रशिया, चीन, ब्राझील आणि साऊथ आफ्रिकेने उरी हल्ल्याचा निषेध केला. या देशांनी द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय, अशा दोन्ही पातळ्यांवर दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाई करण्यावर एकमत दर्शविले.
का नाही घेतले गेले लष्कर आणि जैशचे नाव
- अमर सिन्हा म्हणाले, की पाकिस्तानच्या या संघटनांचे लक्ष्य भारत आहे. त्यामुळे हा प्रश्न इतर ब्रिक्स राष्ट्रांना सतावत नाही. कदाचित त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख टाळला गेला असावा. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट आणि जबात-अल-नुसरा यांचा संयुक्त जाहीरनाम्यात उल्लेख आहे.
- ते म्हणाले, 'गोवा जाहीरनाम्यात आयएसआयएस आणि दुसऱ्या दहशतवादी संघटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. माझ्या माहितीप्रमाणे ज्या दहशतवादी संघटनांवर यूएनने बंदी घातली आहे त्यांचा उल्लेख करण्यात आला.'
- 'त्याचबरोबर भारताने दहशतवादाविरोधात इतर देशांना आपल्यासोबत घेण्यात यश मिळविले आहे. संयुक्त जाहीरनाम्यात सर्व देशांनी दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाई करण्यासाठी योग्य पावले उचलण्याचे निश्चित केले आहे.'
पुढील स्लाइडमध्ये, दहशतवादविरोधी कारवाईवर एकमत
बातम्या आणखी आहेत...