आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप देशाला देईल कॉंग्रेसच्‍या कुशासनापासून मुक्‍ती- नरेंद्र मोदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माधोपूर- आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (भाजप) देशाला कॉंग्रेस मुक्‍त शासन देण्‍यासाठी वचनबद्ध असल्‍याचे आश्‍वासन गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिले. मोदींनी माधोपूर येथे निवडणुकीच्‍या प्रचाराची औपचारिक सुरूवात केली. राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे संस्‍थापक डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांच्‍या बलिदान दिवसातील समर्पित रॅलीला संबोधित करताना त्‍यांनी देशातील जनतेला भ्रष्‍टाचार, घोटाळेबाज संपुआ सरकारपासून मुक्‍ती पाहिजे भाजप त्‍यांना यापासून मुक्‍ती देईल, असे त्‍यांनी म्‍हटले.

मोदी म्‍हणाले, डॉ. मुखर्जी यांनी देशाची एकता आणि अखंडतेसाठी बलिदान दिले होते. परंतु, दुर्दैव हे आहे की, कॉंग्रेसप्रणीत केंद्र सरकार कोणाचेही बलिदान स्‍वीकारतही नाही आणि मान्‍यही करत नाही. यावेळी मोदींनी काँग्रेसने सुरू केलेल्‍या 'भारत निर्माण हक है मेरा' या जाहिरातीची खिल्‍ली उडवताना म्‍हटले कॉंग्रेसचे धोरण हे 'भारत निर्माण शक है मेरा' असे म्‍हटले. मी त्‍याची खिल्‍ली उडवल्‍यानंतर आता ही जाहिरात कॉंग्रेसने बंदी केली, असे त्‍यांनी सांगितले. कॉंग्रेसच्‍या चुकीच्‍या धोरणांमुळे देश विकासाच्‍या स्‍पर्धेतून मागे पडला आहे. बेरोजगारांची संख्‍या वाढली आहे. हे कॉंग्रेसला दिसत नाही, असेही त्‍यांनी म्‍हटले.