आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअरो इंडिया एक्सपोचे उद्घाटन, मोदी म्हणाले संरक्षण क्षेत्रातील निर्मिती अत्यंत महत्त्वाची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेंगळुरू - भारतातील संरक्षण क्षेत्रासाठी एका नव्या युगाची सुरुवात झाले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांच्या हस्ते बेंगळुरूमध्ये एअरो इंडिया एक्सपोचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी बोलताना पंतप्रधानांनी हे मत मांडले आहे. यावेळी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचीही यावेळी उपस्थिती होती.
फोटो - उद्घाटनानंतर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

भारताच्या संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योगांचा विकार करण्यावर आपण लक्ष केंद्रीत करत असून त्या दिशेने एक मोहीम चालवली जात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. अशा प्रकारच्या आयोजनांवरून जागतिक स्तरावर भारताचा दर्जा उंचावल्याचे स्पष्ट होत असल्याचे मोदी यावेळी म्हणाले. आपल्यासमोर संरक्षणाबाबत असलेल्या आव्हानांचा विचार करता आपण या क्षेत्रात जास्तीत जास्त स्वावलंबी होणे गरजेचे आहे. भारत तंत्रज्ञान क्षेत्रात अत्यंत वेगाने प्रगती करत आहे. संरक्षण क्षेत्रातही स्वतःची धोरणे आखून आपण या क्षेत्रात उतरत आहोत. त्यामुळे या क्षेत्रातील उत्पादन वाढीसाठी आणि गुंतवणूक आणण्यासाठी तसेच आर्थिक विकासासाठी हा शो म्हणजे भारताला एक चांगली संधी असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.
भारतासह जगभरातील सुमारे 600 हून अधिक कंपन्या पाच दिवस चालणाऱ्या या एक्सपोमध्ये सहभागी होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांना संरक्षण उत्पादनांच्या निर्मितीमध्ये गुंवणुकीसाठी आकर्षित करण्यासाठी मोदी सरकारची भूमिका नेमकी काय असणार? याकडे सगळ्यांच्या नजरा होत्या. त्या पार्श्वभूमीवर या क्षेत्रास सरकारी, खासगी आणि परदेशी अशा सर्व गुंतवणूकदारांना संधी राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच त्याचवेळी भारतातील उत्पादकांना प्रथम प्राधान्य राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, शोमधील विविध पथकांनी सादर केलेल्या कवायती..