आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारची 3 वर्षे : मंत्र्यांना मिळाला होमवर्क, तयार करावी लागेल 5 यशस्वी कामांची यादी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदींनी 26 मे 2014 ला पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. - Divya Marathi
मोदींनी 26 मे 2014 ला पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती.
नवी दिल्ली - मोदी सरकारला 26 मे रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. हा उत्सव साजरा करण्यापूर्वी सरकारने सर्व मंत्रालयांना 5-5 यशस्वी कामांची यादी तयार करण्यास सांगितले आहे. यात मंत्र्यांना सामान्य नागरिकांना फायदा झाला असेल अशी कामे सांगावी लागणार आहेत. भाजपने सत्तेत आल्यानंतर काय बदल घडवून आणला आहे हे सांगणे हा त्यामागचा उद्देश आहे. 

सर्व मंत्रालयांना पाठवले पत्र 
- न्यूज एजन्सीच्या मते, या आठवड्यात माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सर्व मंत्रालयांना एक पत्रही पाठवले आहे. यात सर्व मंत्र्यांना आपल्या आपल्या मंत्रालयाच्या योजना आणि कामाची माहिती देण्यास सांगितले आहे. 
- सर्व मंत्रालयांच्या माहितीच्या आधारे एक डाटा बुकलेटही तयार केले जाईल. ते 26 मे पूर्वी प्रकाशित केले जाईल. 26 मे  2014 ला नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. 

सर्व मंत्रालयांना बुलेट फॉर्ममध्ये ३ पानांची नोट तयार करण्याचे निर्देश 
- नायडू यांनी पाठवलेल्या पत्रात केवळ बुलेट फॉर्ममध्ये 3 पानांची नोट तयार करण्यास सांगितले आहे. या नोटमध्ये 5 पॉइंट कव्हर केले जातील. 
1. जनतेला फायदा झाला असेल आणि लोकांनी कौतुक केले असेल अशी पाच यशस्वी कामे. 
2. मंत्रालयाच्या खास कामगिरी दाखवणारे काम. 
3. मंत्रालयाच्या योजनांची पूर्ण माहिती. त्यात 2014 मध्ये काय स्थिती होती आणि 2017 मध्ये काय प्रगती झाली याची माहिती द्यावी लागेल. उदाहरणार्थ - पेट्रोलियम मंत्रालयाला हे सांगावे लागेल की, 2014 मध्ये किती एलपीजी कनेक्शन होते आणि 2017 मध्ये किती आहेत?  
4.मंत्रालयाने केलेल्या तीन सुधारणा- प्रक्रिया, धोरणात्मक, अंमलबजावणीत, कार्यक्रमात
5.एक - एक पॅरामध्ये दोन टॉप सक्सेस स्टोरी. 
 
यापूर्वी सरकारची धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यास सांगितले होते 
- यापूर्वी 21 मार्चला एका पत्रात व्यंकय्या नायडू यांनी मंत्री आणि पक्षाच्या ज्येष्ठ मंत्र्यांना सध्याच्या एनडीए सरकारने केलेल्या सकारात्मक बदलांबाबत माहिती देण्यास सांगितले होते. 

सरकारने मंत्र्यांची यादी तयार केली 
- सरकारने विशेष मुद्द्यांवर नोट तयार करणाऱ्या मंत्र्यांची यादी तयार केली आहे. 
- केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एमजे अकबर यांना मोदींचे परराष्ट्र दौरे, त्यांचे परिणाम तसेच परकीय गुंतवणूक याबाबत नोट तयार करण्यास सांगितले आहे. 
- खासदार स्वप्न दासगुप्ता आणि चंदन मित्रा यांना रोजगार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मुद्द्यांवर माहिती तयार करावी लागेल. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...