आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Have Ideas, While Rahul Have Mother Novelist Chetan Bhagat

मोदींजवळ आयडियाज, तर राहुलकडे फक्त माँ - प्रसिद्ध कादंबरीकार चेतन भगत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर - जो देशाच्या नागरिकांची विद्यार्थ्यांसारखी देखभाल करतो, त्यांना प्रगती करण्यात मदत करतो, अशा शाळेच्या मुख्याध्यापकाप्रमाणे देशाचा पंतप्रधान असावा. नरेंद्र मोदींनी हे काम केले आहे. ते एक चांगले वक्ते आहेत. त्यांच्याकडे भरपूर नवनवीन कल्पना आहेत. राहुल गांधींजवळ फक्त आणि फक्त आईच आहे. यापेक्षा अधिक काय आहे हे मला माहीत नाही. त्यांचे गुण कुणी मला सांगितले तर मी संपूर्ण देशात त्यांचा प्रसार करीन, असे रोखठोक मत यूथ आयकॉन आणि लेखक चेतन भगत यांनी ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केले.


मोदी गुजरात, तर उत्तर प्रदेश सरकार मुजफ्फरनगर दंगलीसाठी दोषी :
गुजरात दंग्यांसाठी जर नरेंद्र मोदी दोषी असतील, तर मुजफ्फरनगरमधील दंगलीसाठी उत्तर प्रदेश सरकार दोषी असल्याचा आरोप चेतन भगत यांनी केला आहे. 2013 मध्ये दंगली घडणे आश्चर्यकारक बाब आहे. तुम्ही सुशिक्षित आहात आणि एखाद्याने तुम्हाला एखादा व्हिडिओ दाखवला, तर तो व्हिडिओ पाहून तुमच्या भावना भडकतील आणि तुम्ही कुणाला तरी भोसकाल का? दबा धरून बसलेले समाजकंटकच असे काम करतात, असेही ते म्हणाले.


काँग्रेस मोबाइल वाटूनही निवडणुका जिंकू शकते
भगत यांनी येत्या निवडणुकीविषयी भाष्य केले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपदरम्यान तुल्यबळ स्पर्धा होईल. भाजप फॉर्मात आहे, परंतु काँग्रेसला निवडणूक जिंकण्याची कला अवगत आहे. आंध्र प्रदेशच्या लहानशा गावातील लोक मोदींना नव्हे, तर गांधींना ओळखतात. मोदींना गुजरातबाहेर ओळख बनवावी लागेल.. काँग्रेस तर मोबाइल वाटूनही निवडणुका जिंकू शकते, असे मत त्यांनी मांडले.