आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Inaugurates The Shri Mata Vaishno Devi Narayana Superspeciality Hospital

मोदींंनी केले मुलींचे कौतूक, म्हणाले- आता मुलांनाच आरक्षण मागावे लागेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कटरा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मूच्या कटरा येथे मंगळवारी श्री माता वैष्णोदेवी विद्यापीठाच्या पाचव्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनासाठी काही धडे दिले. दीक्षांत समारंभात मुलींनीच बहुतांश पदके पटकावल्याने मोदींनी,‘मुलींची कामगिरी अशीच राहिली तर मुलांना सुवर्णपदकासाठी आरक्षण मागण्याची वेळ येईल,’ अशी नर्मविनोदी टिप्पणी केली.

जम्मू-काश्मीरमधील श्रीमाता वैष्णोदेवी विद्यापीठाच्या पाचव्या दीक्षांत समारंभात मार्गदर्शन करताना मोदी म्हणाले की, एकविसाव्या शतकासाठी ज्ञान हीच ऊर्जा असणार आहे. भारताकडे ही ऊर्जा आहे. त्यामुळेच भारत एकविसाव्या शतकावर राज्य करेल. भारताकडे ३५ वर्षांखालील ८० कोटी तरुणांची शक्ती आहे. त्यातील प्रत्येक तरुणाचे स्वप्न ही देशाची विकासगाथा ठरू शकते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात ‘पुढे काय’ असा प्रश्न येऊ शकतो. पण पुढे काय होणार आहे हे माहीत असणाऱ्याला इतरांवर अवलंबून राहण्याची गरज नसते. तुम्ही तुमच्या लहानपणी काहीतरी करू असा विचार केलाच असेल, पण कदाचित तो अजूनही प्रत्यक्षात आला नसावा. ते विसरून जा आणि तुम्ही काय साध्य केले याचा विचार करा, असा सल्लाही पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिला.
पुढील स्लाइडवर वाचा, कलामांचा उल्लेख... देणगीतून विद्यापीठ... स्वप्नं पाहा, प्रत्यक्षात आणा...