आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोची मेट्रो सेवेत 23 तृतीयपंथी अन् एक हजार महिला कर्मचारी, मोदींच्या हस्ते शुभारंभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोची - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोची मेट्रो रेल्वेचा शुभारंभ केला. या मेट्रोमध्ये २३ तृतीयपंथी एक हजार महिलांना नोकरी दिली आहे. कोची मेट्रोने घेतलेल्या या पुढाकाराची मोदींनी स्तुती केली आहे. मेट्रो सुरू करणारे कोची हे देशातील आठवे शहर आहे.
 
मोदींनी यावेळी पलारिवट्टमहून पथादिपल्लम स्टेशनपर्यंत मेट्रोने प्रवास केला. त्यांच्यासोबत मेट्रो मॅन नावाने प्रसिद्ध असलेले श्रीधरण हेसुद्धा उपस्थित होते. एकूण प्रकल्प २६ किलोमीटरचा असून उर्वरित काम दुसऱ्या टप्प्यात पूर्ण होणार आहे. कोचीपूर्वी दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, जयपूर, बंगळुरू लखनऊतही मेट्रो सेवा सुरू झालेली आहे.
 
कोची मेट्रो : देशात प्रथमच ४५ महिन्यांत १३ किमी मार्ग तयार
कोची मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम फक्त ४५ महिन्यांत पूर्ण करण्यात आले. मुंबईत मेट्रोच्या ११ किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे काम ७५, तर चेन्नईत किलोमीटरचे काम ७२ महिन्यांत तर जयपूर मेट्रोचा पहिला टप्पा ५६, दिल्ली बंगळुरूत ५० महिन्यांत पूर्णत्वास आला होता. या प्रकल्पासाठी लागणारी २५ टक्के वीज सौरऊर्जेतून तयार केली जाणार अाहे. अशी उपाययोजना करणारा हा देशातील पहिलाच मेट्रो प्रकल्प ठरला आहे. सौर पॅनलमधून २.३ मेगावॅट वीज तयार केली जात असून मेगावॅटचा प्रकल्प सुरू करण्याची योजना आहे. असे झाल्यास आवश्यक निम्मी वीज सौरऊर्जेद्वाराच मिळेल.
 
८०टक्के कर्मचारी महिला, २३ तृतीयपंथीयांचाही समावेश  
कोचीमेट्रो ही देशातील पहिलीच सरकारी सेवा आहे, ज्यात २३ तृतीयपंथीयांना आणि एक हजार महिला कर्मचाऱ्यांनाही रोजगार देण्यात आला आहे. हे प्रमाण एकूण कर्मचाऱ्यांपैकी ८० टक्के आहे. या ठिकाणहून आसपासच्या १० बेटांसाठी फेरी सेवा सुरू होणार आहे. ही सेवा २०१८ अखेरपर्यंत सुरू होईल.
 
पुष्पगुच्छांऐवजी पुस्तक भेट द्या : पंतप्रधान
लोकांनीआनंदाच्या क्षणी पुष्पगुच्छ भेट देण्याऐवजी पुस्तके भेट द्यावीत, असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी दिला आहे. केरळमध्ये रीडिंग मंथ सेलिब्रेशनच्या उद््घाटनावेळी ते बोलत होते.
 
हजार खांबांवर व्हर्टिकल गार्डन : मेट्रोच्या हजार खांबांवर व्हर्टिकल गार्डन बनवण्याची योजना आहे. यात महापालिकेतील पुनर्प्रक्रिया केलेला कचरा वापरला जाईल. वाहनाचा अतिवापर टाळता यावा यासाठी प्रवाशांना प्रत्येक स्टेशनवर येण्याजाण्यासाठी नि:शुल्क सायकल मिळेल. या ठिकाणी वायफाय सुविधाही नि:शुल्क असेल.
बातम्या आणखी आहेत...