आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनी केला 1500 कोटींच्या तीन नव्या प्रकल्पांचा शुभारंभ; निवडणुकीचा शंखनाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिलासपूर - गुजरातनंतर आता भाजपने हिमाचल प्रदेशातही निवडणुकीचे शंख फुंकले आहे. याची सुरुवात मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिलासपूरमध्ये १५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे शिलान्यास आणि लोकार्पण करून केली. यात १३५० कोटी रुपये खर्चाच्या एम्सचाही समावेश आहे. या वेळी मोदींनी हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली. मोदी म्हणाले, बिलासपूरमधील एम्स हे फक्त हिमाचलसाठीच नव्हे तर संपूर्ण उत्तर भारतासाठी फायद्याचे असेल. यामुळे राज्याच्या पर्यटनास चालना मिळेल. हे रुग्णालय संपूर्ण उत्तर भारतासाठी “स्टेट ऑफ आर्ट’ असेल. अनेक वर्षांपासून फक्त ७० कोटी रुपये खर्च असलेला येथील एक स्टील प्रकल्प अडकून पडला होता. कारण, तत्कालीन एकाच सरकारमध्ये अनेक सरकार काम करत होत्या आणि रिमोट कंट्रोलवर चालणारे पंतप्रधान होते.  भाजप सरकार आल्यानंतर प्रकल्प पूर्णत्वास आले. आता येथील नागरिकांना घरे बांधण्यासाठी स्वस्तात लोखंडी गज उपलब्ध होईल. काही दिवसांपूर्वी काही काँग्रेसचे मित्र माझ्याकडे आले. मी त्यांना विचारले की, हिमाचलचे मुख्यमंत्री जामिनावर बाहेर आहेत. तुम्ही त्यांच्या जागी दुसऱ्यांची नेमणूक का करत नाही? सध्या पूर्ण पक्षच जामिनावर आहे. आता हिमाचलला या जामिनावरील सरकारपासून मुक्ती मिळायला हवी, असेही मोदी यांनी या वेळी म्हटले.   
 
वन रँक वन पेन्शन
हिमाचलमध्ये सुमारे १.२५ लाख सेवानिवृत्त जवान असून त्यांना वन रँक वन पेन्शनचा फायदा झाला आहे. यात २५ हजार मुदतीपूर्वी निवृत्ती घेणारे जवानही आहेत. मोदी याबाबत म्हणाले, हे प्रकरण ४० वर्षांपासून लटकलेले होते. मी मंडीत माझ्या सभेत हा मुद्दा निकाली काढण्याची घोषणा केली होती. या योजनेचे दोन हप्ते आतापर्यंत देण्यात आले असून पुढील टप्पाही लवकरच दिला जाईल.  
 
केरळात भाजप कार्यकर्ते शहीद, मुख्यमंत्री जबाबदार : शहा
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी केरळच्या कन्नूरमधून जनरक्षा यात्रेची सुरुवात केली. या वेळी त्यांनी केरळच्या सीपीएम सरकारवर तसेच मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्यावर जोरदार हल्ला केला. ते म्हणाले, केरळमध्ये डावे सरकार आल्यापासून  राजकीय हिंसाचार सुरू आहे. १२० पेक्षा जास्त भाजप कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक शहीद झाले आहेत. त्यांचे हौतात्म्य वाया जाणार नाही. समाजवादी जितका हिंसाचार करतील तितक्याच प्रमाणात येथे कमळ उगवेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.  
 
इंद्रधनुष्य योजना आणि नड्डा : आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा हिमाचल प्रदेशचे असून त्यांचे नाव भाजपकडून संभाव्य मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारात सर्वात पुढे आहे. या वेळी मोदींनी त्यांची खूप स्तुती केली. ते म्हणाले, भारतात लाखो बालक लसीकरणापासून सुटून जातात. नड्डा यांनी इंद्रधनुष्य योजनेअंतर्गत लसीकरणाचे काम सुरू केले .
 
भ्रष्टाचार : मुख्यमंत्री वीरभद्र सिंहांविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात भ्रष्टाचाराची सुनावणी सुरू आहे. ईडीने त्यांची १४ कोटी रुपयांची संपत्तीही जप्त केली आहे. त्यावर मोदी म्हणाले, तीन वर्षे होऊनही आमच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. किती पैसे गेले, असे आधी विचारले जायचे. मात्र, आता किती पैसे आले, असे विचारले जाते.
 
तीनपैकी दोन प्रकल्प यूपीए सरकारचे  
एम्सची कोनशिला तब्बल अडीच वर्षानंतर ठेवण्यात आली आहे. सुमारे १३५० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पात ४००० हजार लोकांना रोजगार मिळेल. २०१३ मध्ये ट्रीपल आयटीची तत्कालीन यूपीए सरकारने घोषणा केली होती. मोदींनी सलोहमध्ये ट्रीपल आयटी संस्थेचा शिलान्यास केला. याला ११० कोटी रुपये खर्च येईल. 
 
बातम्या आणखी आहेत...