आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता परतीची वाट, भारत भेट सार्थक ठरल्याची नवाझ शरीफ यांची भावना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ, अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमिद करझई, श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्यासह सार्क राष्ट्रप्रमुखांनी आज (मंगळवार) सायंकाळी परतीचा वाट पकडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शानदार शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अभय नेते भारतात आले होते.
शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या सार्क राष्ट्रप्रमुखांनी आज (सोमवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मोदींची भेट घेतली. यावेळी मोदींनी 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या सुनावणीला गती देण्याची मागणी केली. मोदींनी श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्याशी तमिळ मच्छीमारांच्या प्रश्नांवर चर्चा केली.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यावर नवाझ शरीफ यांनी बराच काळ मीडियाच्या प्रतिनिधींना ताटकळत ठेवले. मात्र, नंतर शरीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सगळ्यात आधी शरीफ यांनी पत्रकारांची माफी मागितली.

शरीफ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निमंत्रणाने आनंद झाला. तसेच मोदींसोबत झालेली चर्चाही सकारात्मक राहिली. जुने मतभेद विसरुन नव्या संबंधांबाबत आशा पल्लवित झाल्या आहेत. भारत- पाक या दोन्ही देशात शांतता प्रस्तापित करण्‍यासाठी दोन्ही बाजुंनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

पाकिस्तान सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यास तयार असल्याचेही शरीफ यांनी जाताजाता सांगितले. एकूणात भारत भेट सार्थक पावल्याची भावनाही शरीफ यांनी यावेळी व्यक्त केली.
तत्पूर्वी, सार्क राष्ट्रप्रमुखांच्या भेटीगाठी झाल्यावर नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या निवासस्थानी गेले. त्यांची भेट घेऊन वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. विद्यमान पंतप्रधानाने नुकत्याच पदावरून दूर झालेल्या पंतप्रधानाची भेट घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. राजकीय शिष्टाचाराप्रमाणे नुकत्याच पायउतार झालेल्या पंतप्रधानाने विद्यमान पंतप्रधानांची भेट घ्यायची असते.
देशाचे नवे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्याच दिवशी कामाला जोरदार सुरुवात केली आहे. मोदी सार्क देशांच्या प्रमुखांबरोबर भेटी घेत आहेत. सर्वप्रथम त्यांनी हैदराबाद हाऊस येथे अफगाणिस्तानचे पंतप्रधान हमीद करझई यांची भेट घेतली. करझई यांच्याबरोबर विविध विषयांवर चर्चा केल्यानंतर करझई यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांची भेट घेतली आहे.
राजपक्षे यांच्यानंतर नरेंद्र मोदी यांची नवाज शरीफ यांच्या बरोबर भेट घेतली. यावेळी नवाज शरीफ यांच्याबरोबर पाकिस्तानचे शिष्टमंडळही होते. या बैठकीमध्ये सीमेपारच्या दहशतवादाची समस्या आणि द्विपक्षीय संबंध एका वेगळ्या उंचीवर नेण्याच्या दिशेने चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. नरेंद्र मोदींबरोबर चर्चा केल्यानंतर शरीफ यांनी आपल्या शिष्टमंडळासह राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबरही चर्चा केली.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर नवाज शरीफ यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचीही भेट घेतली. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना शरीफ हेच पाकिस्तानचे पंतप्रधान होते. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली होती. तसेच याच काळात दोन्ही देशांदरम्यान प्रथमच बससेवाही सुरु करण्यात आली होती.
मोदी आणि शरीफ यांच्या या भेटीवरच प्रामुख्याने सगळ्यांच्या नजरा लागून होत्या. नवाज शरीफ शपथविधी सोहळ्याला येणार की, नाही या मुद्यापासूनच या विषयाबद्दल उत्सुकता वाढली होती. त्यात भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये आतापर्यंत असलेल्या नात्यांचा इतिहास पाहता, मोदी आणि शरीफ यांच्या भेटीला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. मोदींनी आमंत्रण पाठवणे आणि शरीफ यांनी त्याचा स्वीकार करून शपथविधी सोहळ्याला हजर राहणे हे दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचे मानले जात आहे. शरीफ यांना आमंत्रण पाठवल्याच्या मुद्यावरून देशातूनही काही प्रमाणात विरोध झाला होता.
दरम्यान देशाचे नवे पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सकाळी पंतप्रधानांसाठी असलेल्या बीएमडबल्यू कारमध्ये पंतप्रधान कार्यालयात आले. याठिकाणी अधिका-यांनी मोदींचे स्वागत केले. त्यानंतर मोदींनी कार्यालयात महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले व कार्यभार स्वीकारला. कार्यालयातील औपचारिकता पूर्ण करून मोदी, लगेचच हैदराबाद हाऊसकडे रवाना झाले. याठिकाणी मोदी सार्क देशांच्या प्रतिनीधींची भेट घेत आहेत. या नेत्यांबरोबर मोदी दो्न्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा करत आहेत.
नवाज शरीफ पोहोचले जामा मशीदीत
दरम्यान पाकिस्ताने पंतप्रधान नावज शरीफ सकाळीच जामा मशीदीत गेले होते. तसेच त्यांनी चांदणी चौक परिसरालाही भेट दिली. तसेच शरीफ यांनी लाल किल्ला परिसरालाही भेट दिली.
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपाक्षे यांना दक्षिणेतील नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला. जयललिता यांनी तर या मुद्यावरून मोदींच्या शपथविधीलाही गैरहजेरी लावली. तर एनडीएचे घटकपक्ष असणा-या वायको यांच्या पक्षाने दुपारी दिल्लीमध्ये निदर्शने केली. त्यामुळे त्यांच्या भेटीमध्ये काय चर्चा झाली यावरही सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. दरम्यान, मोदींबरोबर भेटीनंतर सार्क देशांचे प्रमुख परत आपल्या देशाकडे रवाना होणार आहेत.
त्याआधी सोमवारी सायंकाळी नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांच्या 44 मंत्र्यांचा शपथविधी झाला. यावेळी सार्क देशांच्या प्रमुखांसह देशातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पुढील स्लाईड्सवर पाहा दिवसभरातील इतर काही फोटो...