आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीर जवानांचा गौरव: मोदींनी सीमेनजीक साजरी केली जवानांसोबत दिवाळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी हिमाचल प्रदेशातील किन्नौर येथील जवानांची भेट घेऊन त्यांना दिवळीच्या शुभेच्छा दिल्या. - Divya Marathi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी हिमाचल प्रदेशातील किन्नौर येथील जवानांची भेट घेऊन त्यांना दिवळीच्या शुभेच्छा दिल्या.
नवी दिल्ली- यंदाची दिवाळी देशासोबतच जवानांसाठीही खास ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाची दिवाळी जवानांना तर समर्पित केलीच, शिवाय थेट चीनच्या सीमारेषेजवळ जाऊन तेथे देशाच्या संरक्षणार्थ लढणाऱ्या भारतीय जवानांसोबत ती साजरी केली. दुसरीकडे, ‘मन की बात’ या कार्यक्रमातून त्यांनी या जवानांचा गौरवही केला.

मोदी म्हणाले, मागील काही महिन्यांपासून सीमेच्या पलीकडून होत असलेल्या कारवायांना भारतीय जवान सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत. जवानांचे हे बलिदान अतुलनीय आहे. त्यामुळे ही दिवाळी संरक्षण दलांसाठी समर्पित करावी. जवानांच्या कर्तृत्वाबद्दल या देशातील प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे. रविवारी मोदी दिवाळी साजरी करण्यासाठी इंडो-तिबेटियन, लष्कर व डोगरा रेजिमेंटचे जवान तैनात असलेल्या हिमाचल प्रदेशातील किन्नौरला पोहोचले. हे ठिकाण चीन सीमारेषेपासून फक्त २४ किलोमीटरवर आहे. या वेळी मोदींनी आणि जवानांनी परस्परांना मिठाई दिली. या वेळी जवानांना उद्देशून मोदी म्हणाले, ‘यंदा कोट्यवधी भारतीयांनी दिवाळीच्या मुहूर्तावर जवानांसाठीही दिवे पेटवले. दिग्गज कलाकार, क्रिकेटपटू, व्यापारी, अधिकारी, मंत्री, पंतप्रधान आदी प्रत्येक जण दिवा लावत होता तेव्हा त्या दिव्यात तुमचाच चेहरा दिसत होता.’ दरम्यान, सीमारेषेकडे जात असतानाच मोदी यांनी सोम्दूमधील चांगो या गावात अचानक ताफा थांबवून तेथील नागरिकांना सुखद धक्का दिला.

पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून मोदी यांनी तिसऱ्यांदा जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

पौर्णिमा-अमावास्येला सुटीची परंपरा
दिवाळीच्या मुहूर्तावर मोदी यांनी देशाच्या परंपरेची आठवण काढत ती आजच्या गरजांशी जोडली. ते म्हणाले, आपण रविवारी सुटी साजरी करतो. मात्र, प्राचीन काळी आपल्याकडे पौर्णिमा आणि अमावास्येच्या दिवशी सुटी असायची. दिवाळी हे स्वच्छतेचे अभियान असून या माध्यमातून स्वच्छतेची परंपरा कायम ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

इंदिरा गांधींचा उल्लेख
‘मन की बात’ कार्यक्रमात मोदी यांनी देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मरण केले. ते म्हणाले, ३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असून इंदिरा गांधी यांची पुण्यतिथीही आहे. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर वल्लभभाई यांच्या वाढदिवशी हजारो शिखांची हत्या करण्यात आली. स्वातंत्र्याचे आंदोलन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचे मोठे योगदान होते. एकतेसाठी आयुष्य वेचणाऱ्या या महापुरुषाच्या जयंतीदिनी शिखांवरील अत्याचाराचा इतिहास वेदना देऊन जातो.

पुढील स्लाइडवर वाचा, शहीद वीर जवानाचे स्वप्न अखेर सत्यात उतरले; पण...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...