आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Modi News In Marathi, Modi Rally In Himachal Pradesh, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मला मागे-पुढे कुणीच नाही, मी कुणासाठी भ्रष्टाचार करू : मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुजानपूर (हिमाचल प्रदेश) - मी कुणासाठी भ्रष्टाचार करू? माझ्या मागे-पुढे कुणीच नाही. म्हणूनच तन-मनाने सर्मपित भावनेतून मी या कार्यात आहे. आमच्यासारखा माणूसच भ्रष्टाचाराविरुद्ध लढू शकतो, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी रविवारी भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी नवा मंत्र दिला. प्रत्येक वेळी आपला हिशेब मांडणारे काहीच करू शकत नाहीत. त्यासाठी तळहातावर शिर घेऊन चालणारेच लागतात, असेही मोदी म्हणाले.
हिमाचल प्रदेशात हमीरपूरमध्ये सभेत ते बोलत होते. करदात्यांना जिंकण्याचाही त्यांनी या सभेत प्रयत्न केला. ते म्हणाले, प्रामाणिक करदात्यांची भारतात किंमत नाही म्हणूनच परदेशातील काळा पैसा देशात आणून करदात्यांना त्यांनी भरलेल्या कराची रक्कम काही प्रमाणात परत करू.
महागाई कमी करण्याचे काय झाले : काँग्रेसचे गर्विष्ठ नेते महागाईवर बोलायला तयार नाहीत. शंभर दिवसांत महागाई कमी करण्याची भाषा केली, त्याचे काय झाले? काँग्रेसने देशाची माफी मागितली पाहिजे, असे मोदी म्हणाले.
काँग्रेस लोकशाहीची शत्रू
काँग्रेस जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप करून हा पक्ष लोकशाहीचा शत्रू असल्याचे मोदी म्हणाले. काँग्रेसवालेच भ्रष्टाचाराचे खरे धनी आहेत. ते भ्रष्ट नसतील तर मग विदेशातील काळा पैसा परत का आणला जात नाही, असा सवाल त्यांनी केला.
भाजप प्रेम पेरते : विषाची शेती करत असल्याचा आरोप काँग्रेसवाले इतरांवर करतात. मुळात काँग्रेसनेच या देशात विषारी शेती केली. आंध्रचे विभाजन करून तेलंगणाची निर्मिती करण्याचा घाट याचेच लक्षण आहे, अशा शब्दांत मोदींनी आसूड ओढले.