आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानांचा सुरतमध्ये 10 किमी पर्यंत रोड शो, 25 हजार बाईक्सवर 50 हजार बाइकर्स, डिस्को लाईट्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद / भुवनेश्वर - पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून सुरत येथे त्यांनी 10 किमीचा रोड शो केला. 25 हजार बाईक्सवर 50 हजार बाइकर्तस सहभागी झाले. यात अनेक महिलांचा देखील समावेश होता. तत्पर्वी ओडिशा दौऱ्यात लिंगराज मंदिरात त्यांनी लिंगराज (शंकर) चे आशीर्वाद घेतले. 
 
मोदी 2 दिवस गुजरातमध्ये 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास सुरत विमानतळावर दाखल झाले. यावेळी त्यांनी सुरतमध्ये 10 किमी पर्यंतचा रोड शो केला. रोड शो झाल्यानंतर ते शासकीय विश्राम गृहात मुक्काम करतील. याच ठिकाणी ते रात्रीचा मुक्काम करणार आहेत. तसेच 2 दिवस येथील विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवतील.
 
 
 
तत्पर्वी भुवनेश्वर दौऱ्यात ते म्हणाले...
- मला स्वातंत्र्य लढ्यातील सैनिकांच्या कुटुंबीयांना भेटण्याची संधी मिळाली, हे माझे सौभाग्य आहे. 
- मोदींनी राजभवनात स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईंना गौरवले. 
- आपल्या देशात एवढ्या मोठ्या स्वातंत्र्य लढ्याला अगदी मोजक्या घटनांमध्ये मर्यादीत करून ठेवण्यात आले. पण त्याउलट हे त्याग आणि बलिदानाने ओतप्रोत असे आंदोलन होते. 
- भारतासारख्या स्वाभिमानी देशासाठी अशा सर्व घटनांची आठवण राहावी यासाठी आम्ही एक योजना आखली आहे. 
- भारतात ज्या ज्या ठिकाणी विविध समाजातील लोक राहतात त्यांनी इंग्रजांशी लढण्याचा विडा उचलला होता. 
- आता विविध समाजातील या नागरिकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान, व्हर्च्युअल माध्यमातून पुनरुज्जीवित केले जाईल. नव्या पिढीला या त्यागाबाबत माहिती द्यायची आहे. 
- देशातील विविध राज्यांतील विविध समाजांचा इतिहास समोर आणायचा आहे. 2022 मध्ये जेव्हा स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी केली जातील तेव्हा भारत अशा वीरांच्या स्वप्नातील देश बनेल यासाठी काम करायचे आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, सुरत व लिंगराज मंदिरातील मोदींचे PHOTO
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...