आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींची ममतांवर स्तुतिसुमने !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोलकात्यात प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची तोंड भरून स्तुती केली. बिगर काँग्रेसी राज्यांना केंद्र सरकार सापत्न वागणूक देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यूपीएला सरकार पडण्याचा धोका क्षणोक्षणी धडकी भरवत आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की केंद्र सरकार कॅलेंडर नव्हे घड्याळच पाहत आहे.


शहरातील तीन चेंबर ऑफ कॉमर्सच्या संयुक्त कार्यक्रमात मोदी बोलत होते. त्यांचे भाषण आणि नंतर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम जवळपास दीड तास चालला. गुजरात आणि प. बंगालची तुलना करण्यासाठी आपण येथे आलो नसल्याचे मोदींनी प्रारंभीच स्पष्ट केले. गुजरातच्या सध्याच्या विकासामागे गेल्या 12-13 वर्षांचे प्रयत्न आहेत. मात्र, प. बंगालमध्ये डाव्या पक्षांनी 32 वर्षे जे खड्डे खोदले ते बुजवण्यासाठी किती वर्ष लागतील हे सांगणे कठीण आहे, असेही ते म्हणाले. तृणमूल सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे ते पाहता ममता बॅनर्जी निश्चितपणे यशस्वी होतील, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.


प. बंगालची स्तुती
* प. बंगाल सरकार चांगले काम करत आहे. त्यांची दिशा योग्य आहे.
* देशाच्या विकासासाठी इशान्येकडील राज्ये तसेच प. बंगालचा विकास आवश्यक.
* कोलकात्यात काही शिकण्यासाठी आलो आहे. गुजरातला त्याचा फायदा होईल.
केंद्र सरकारवर हल्ला
* केंद्र सरकार कॅलेंडर नव्हे, घड्याळाकडे पाहत आहे. ते कधीही कोसळू शकते.
* इटलीला घाबरतात म्हणून सुप्रीम कोर्टाला निर्देश द्यावे लागले. > पाकिस्तानी सैनिक हल्ले करतात, सरकार त्यांना मेजवानी देते.
निदर्शक अटकेत
मोदींविरुद्ध कोलकात्यात निदर्शने करणाºया 21 लोकांना अटक करण्यात आली. यात माओवादी संघटनांचा सहभाग होता. या लोकांनी मोदींना काळे झेंडे दाखवले.