आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Rally In Amethi Salman Khurshid Hits At BJP PM Candidate

फैजाबादमध्ये फसले मोदी: व्यासपीठावर मंदिराचा फोटो, भाषणात शपथ घेतल्याने तक्रार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेच्या प्रचार अभियानात प्रथमच राम आणि राममंदिरचा सहारा घेतला. उत्तरप्रदेशच्या फैजाबाद येथील सभेमध्ये त्यांच्या व्यासपीठावर अयोध्येतील नियोजित राममंदिराचा फोटो होता. तर भाषणातही मोदींनी रामाची शपथ घेतली. आतापर्यंत संपूर्ण प्रचारात विकासाच्या नावावर निवडणूक लढवणारे मोदी फैजाबादमध्ये धर्माच्या आधारावर मते मागताना दिसले. काँग्रेसनेही लगेचच वेळ न दवडता याच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. तर आयोगानेही लगेचच जिल्हा प्रशासनाद्वारे तक्रार दाखल करून घेतली.

फैजाबादमध्ये मोदींनी रामनामाचा सहारा घेतल्याचे चित्र दिसले. मोदी म्हणाले, 'मी श्रीरामाची शपथ घेतो की, आयुष्यभर भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देत राहील. श्रीरामाच्या भूमीतून कमळ घेऊन जाण्याची माझी इच्छा आहे.' असेही मोदी यावेळी म्हणाले.

मोदींनीच भाजपच्या जाहीरनाम्यातून मंदिराचा मुद्दा दूर ठेवला असे म्हटले जाते. जाहीरनाम्याच्या केवळ शेवटच्या काही ओळींमध्ये या मुद्याचा उल्लेख आहे. पण फैजाबादमध्ये मोदींच्या व्यासपीठावर अयोध्येमधील नियोजीत मंदिराचा फोटो होता.

मोदी यांनी सोमवारी उत्तरप्रदेशात एका पाठोपाठ अनेक मॅरेथॉन सभा घेतल्या. फैजाबाद आणि आंबेडकर नगर येथील त्यांच्या सभांमध्ये काही ना काही घडलेच. पण तरीही सगळ्यांच्या नजरा त्यांच्या अमेठीतील सभेकडे लागलेल्या आहेत.

आंबेडकर नगरच्या सभेमध्ये मोदी यांनी संजू देवू नावाच्या एका नहिलेच्या वेदनाही सर्वांसमक्ष मांडल्या. ते म्हणाले, ' या संजू देवी आहेत. त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. पण सरकारने यांच्यासाठी काय केले. मोदींच्या या प्रकारणाची तुलना राहुल गांधींच्या कलावती प्रकरणाबरोबर केली जात आहे.