आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचा राहुल गांधींवर घणाघाती हल्‍ला, आकाशवाणी करुन लुप्‍त होतात नेते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची- भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर हल्‍लाबोल करताना झारखंडच्‍या मागासलेपणासाठी कॉंग्रेसला दोषी ठरविले. प्रचंड नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असलेले झारखंड राज्‍य जगातील विकसित देशांची बरोबरी करण्‍यास सक्षम आहे. परंतु, कॉंग्रेसच्‍या धोरणांमुळे झारखंड मागासलेलेच राहिले, असे मोदी म्‍हणाले. कॉंग्रेसचे देशावर ओझे झाले आहे. कॉंग्रेस देशासाठी संकट आहे. कारण, कॉंग्रेस देशाच्‍या जनतेपासून दूर गेली आहे. आगामी लोकसभा निवडणूक जनआंदोलन असून यावेळी राज्‍यातील लोकसभेच्‍या सर्व 14 जागा भाजपला
देण्‍याचे आवाहन मोदींनी झारखंडच्‍या जनतेला केले.

कॉंग्रेसचे उपाध्‍यक्ष राहुल गांधींवर टीका करताना मोदी म्‍हणो, महागाई, भ्रष्‍टाचार यासारख्‍या मुद्यांवर कॉंग्रेसचे नेते बोलत नाहीत. पत्रकारांना बोलावतात. परंतु, आकाशवाणी करुन लुप्‍त होतात. जबाबदार व्‍यक्ती त्‍यांचे दायित्त्व पार पडत नाहीत. कॉंग्रेस लोकांच्‍या डोळ्यात धुळफेक करत असून देशाच्‍या विकासाची चिंता नाही.

मोदींची कॉंग्रेसवर कडाडून टीका... वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...