आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Said Rahul Is Not Doing Anything About Job Creation For Youth

इंदिरा गांधींनी केलेल्या विकासाच्या दहा पट्टींनी विकास करणार; नरेंद्र मोदींचा विश्वास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- इंदिरा गांधी यांना चिकमंगलूर येथील जनतेने पाठिंबा दिला. मात्र, जनतेला काय म‍िळाले? इंदिरांनी तुम्हाला काय दिले, इंदिरांनी जो काही विकास केला त्यापेक्षा दहा पटीने जास्त करून दाखवणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी कर्नाटकमधील चिकमंगलूर सभेला संबोधित केले.

दिल्लीत बसलेली सरकार पांगळी आणि कर्णबधीर झाल्याची खोचक टीका नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली. सोनिया गांधींनी 10 वर्षे राज्य केले. परंतु, देशातील जनतेला काय म‍िळाले तर महागाई आणि भ्रष्टाचार. देशातील जनतेला सुशासन हवे आहे. विकास हवा असल्याचे मोदींनी सांगितले.

दरम्यान, नरेंद्र मोदी आज (रविवार) चेन्नईमध्ये सुपरस्टार रजनीकांत यांची भेट घेणार आहे. रजनीकांत यांच्या निवासस्थानी संध्याकाळी पाच वाजता ही भेट होईल. या दरम्यान दोघांमध्ये निवडणुकीबाबतही चर्चा होईल, यामध्ये राष्ट्रीय तसेच प्रादेशिक मुद्द्यांचा समावेश असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

यानंतर मोदी चेन्नईमध्ये एनडीएच्या मित्रपक्षांसोबत चेन्नईमध्ये रोड शो करतील आणि त्यानंतर सभेला संबोधितही करणार आहे. रजनीकांत यांनी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यावा, अशी मागणी तामिळनाडूमधील भाजप नेत्यांनी केली. मात्र, रजनीकांत यांनी यासंदर्भात आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक वक्तव्य केलेले नाही. पण, आज रजनीकांत यांच्या भेटीत काय परिवर्तन होते, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

मोदींनी मागितले तीनशे कमळ... वाचा पुढील स्लाइड्‍सवर..