आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींंसाठी मंच सजवणाऱ्या मजुराचा शॉक लागून मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी मंच सजवत असलेल्या देवनाथ नामक २० वर्षीय युवक मजुराचा बुधवारी रात्री विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. दरम्यान, पावसामुळे तिसऱ्यांदा मोदी यांचा वाराणसी दौरा रद्द झाला. गुरुवारी पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उद‌्घाटन होते. मात्र, जोरदार पावसामुळे विमानतळापासून ते कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंतच्या रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यामुळे, पंतप्रधानांचा दौरा रद्द करण्यात आला. यापूर्वी १४ अॉक्टोबर २०१४ मध्ये हुदहुद चक्रीवादळामुळे आणि २८ जून रोजी जोरदार पावसामुळे त्यांच्या दौऱ्यात अडचण आली होती.
दरम्यान, ऊर्जा मंत्री पीयूष गोयल यांनी मृताच्या परिवाराला साडेसात लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मोदींंचा दौरा रद्द झाल्याचे कळताच काँग्रेस आमदार अजय राय व अविमुक्तेश्वरानंद यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते आणि संतांनी बनारस हिंदू विद्यापीठातील सुपर स्पेशालिटी ट्रॉमा सेंटरचे उद‌्घाटन केले.
बातम्या आणखी आहेत...