आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनी घेतला गुरूंचा आशीर्वाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री आपले गुरू स्वामी आत्मस्थानंद महाराजांचे रुग्णालयात जाऊन आशीर्वाद घेतले. स्वामींच्या सहायकांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. स्वामीजी ९७ वर्षांचे असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मोदींनी गुरूंना शाल आणि धोतर भेट म्हणून दिले.

आत्मस्थानंदांचाच माेदींना सल्ला
मोदी १६ वर्षाचे असताना स्वामी आत्मस्थानंद राजकाेटमध्ये होते. मोदींनी त्यांना भेटून संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र स्वामींनी ‘तुमचा जन्म समाजसेवेसाठी आहे, संन्यासासाठी नाही,’ असे सांगून त्यांना बेलूर मठाच्या तत्कालीन स्वामीजींकडे पाठवले होते. त्यांनीही हाच सल्ला दिला. मग मोदी रा.स्व. संघात गेले.
बातम्या आणखी आहेत...