आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींची भाषणे सांगतात त्यांनी पराजय स्वीकारला, बसपला दलितांचाच पक्ष ठरवणे कटाचाच भाग : मायावती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- पंतप्रधान मोदी यांनी एका दिवसापूर्वीच उत्तर प्रदेशातील मतदारांना आवाहन विनंती केली की त्यांनी जातीच्या आधारावर मतदान करू नये, यावर बसपाच्या प्रमुख मायावती यांनी आज सांगितले की, या मोदींच्या विधानावरून भाषणावरून त्यांनी आताच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पराजय स्वीकारला आहे. आणि आपला पक्ष जातीयवादी असल्याचे फेटाळून लावण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. 
 
मायावतींनी पंतप्रधानांवर हल्ला चढविताना नोट बंदी साफ अपयशी झाली असून त्याद्वारे कुठलाही काळा पैसा बाहेर आलेला नाही. परदेशातून काळा पैसा बाहेर आणणे तर दूरच, दैनंदिन जीवनातील समस्यांपासून तसेच निवडणुकीतील २५ टक्के आश्वासने देखील पूर्ण करू न शकल्याने व आपल्या समस्या सोडविण्यातील अपयशापासून लोकांचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठी या नोट बंदीच्या मुद्द्याचा वापर केला गेला, असे म्हटले आहे.
   
त्यांचे कालचे सोमवार लखनऊतील भाषण हे स्पष्टच दर्शवते की, पंतप्रधानांनी व त्यांच्या पक्षाने युपी निवडणुकीतील आपला पराजय आताच जणू मान्य केला आहे. आणि त्यांचा पक्ष (भाजप) उत्तर प्रदेशात कुठल्याही स्थितीत सत्तेत येणार नाही. बसपा प्रमुख मायावती पुढे म्हणाल्या की, उत्तर प्रदेशची ही निवडणूक फक्त जय - विजयासाठी लढली जाणार नाही. आता पंतप्रधान मोदी आणि भाजप पक्षप्रमुख अमित शहा यांची चमक यांचा प्रभाव ओसरला आहे. आणि कालच्या लखनऊच्या रॅलीस न मिळालेल्या प्रतिसादाने हे सिध्द झालेच आहे. त्यांच्या बोलण्याची पध्दत आणि त्यांची विधाने यामुळे ते उत्तर प्रदेशात सत्तेवर येणार नाही हे निश्चित, असेही मायावती म्हणाल्या. 
  
बसपला जाणीवपूर्वक दलितांचा पक्ष ठरविणे हा देखील एका राजकीय कटाचाच भाग आहे. विरोधकांनीही बसपला जातीयवादी पार्टी ठरविणे आणि त्यामुळे त्या पक्षास बसपला मते देऊ नये, असा अपप्रचार करणे चुकीचेच आहे. तो त्यांचा राजकीय कटच आहे. गेल्या चार सरकारांच्या काळात बसपने केवळ दलितच नव्हे तर सर्वच जातींच्या विकासासाठी काम केले, अशी आठवणही मायावतींनी केली आहे. या वेळी त्यांनी उच्च जातीतील लोकांना आर्थिक आधारावर आरक्षण द्यावे, अशी मागणी संसदेत व संसदेबाहेरही केल्याची आठवण दिली.  

मायावतींचे जागावाटपाचे सोशल इंजिनिअरिंग   
जातीनिहाय तपशील देतेवेळी मायावतींनी ४०३ जागांपैकी निवडणुकीत उमेदवारीच्या  ८५ जागा या एससी आणि ८७ तिकिटे दलितांना दिली जातील तसेच ९७ तिकिटे मुस्लिमांना दिली जातील, तर १०६ जागा ओबीसींना, तर उर्वरित ११३ जागा उच्च जातीतील लोकांसाठी असतील (६६ ब्राह्मणांना, ३६ क्षत्रियांना आणि ११ कायस्थांना व वैश्यांना, पंजाबींसाठी असतील) यात काहीही बदल होणार नाही आणि कुणाशीही युती होणार नाही, असेही मायावतींनी या वेळी स्पष्ट केले. 
बातम्या आणखी आहेत...