आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi To Address Vijay Shankhnad Rally In Gorakhpur

उत्तर प्रदेशातील हवा बदलाच्या दिशेने- नरेंद्र मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोरखपूर- उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये भाजपची शंखनाद रॅलीला संबोधित करताना पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, यूपीतील सध्याची हवा बदलाच्या दिशेने आहे. रॅलीत सहभागी झालेल्या लोकांवरून या हवेची स्पष्ट कल्पना येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मोदींनी यावेळी काँग्रेसवर आपल्या नेहमीच्या शैलीत हल्लाबोल केला. मोदी म्हणाले, काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या आधीच गरीबीची चर्चा करतो. स्वातंत्र्यानंतर काँग्रसने 60 वर्षे राज्य केले. त्या काळात त्यांनी गरीबी का दूर केली नाही. मग ते आता काय करणार आहेत. काँग्रेस नेत्यांना गरीबी हवी आहे कारण जनतेला गरीब ठेवण्यातच त्यांचे हित आहे.
काँग्रेसनंतर मोदींनी मुलायसिंग आणि त्यांच्या समाजवादी पक्षाकडे मोर्चा वळविला. मोदी म्हणाले, उत्तर प्रदेशात सगळे आहे शेती आहे, पशुधन आहे मग दूध का बाहेरील राज्यातून आणावे लागत आहे. गुजरातमध्ये जागतिक पातळीची अमूल डेअरी आहे मग भल्यामोठ्या यूपीत का नाही. यूपीतील शेतक-यांना शेतीमालाचा योग्य भाव का मिळत नाही. हे होईल चित्र बदलेल. यूपी प्रगतीपथावर येईल व मात्र त्यासाठी तुम्ही मला 60 महिने द्यायला हवीत. मुलायमसिंगांच्या पक्षाने यूपीत काहीही केले नाही. त्यांना दूर करण्याची वेळ आली आहे. जातीयवादी व धर्मांधतेचे राजकारण आता चालणार नाही.
मुलायमसिंगांनी मोदींवर केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना म्हटले की, आज नेताजींनी (मुलायम सिंह यादव) माझ्यावर टिप्पणी केली. ते म्हणतात यूपीला गुजरात बनवायचा नाही, खरं म्हणाले नेताजी तुम्ही यूपीला गुजरात बनवूच शकत नाही. कारण गुजरात म्हटले की, 24 तास वीज, विकास, सुख-समाधान आणि शांतीच शांती, होय हे आपल्याला यूपीत नकोच आहे. त्यामुळे तुम्हाला यूपीला गुजरात बनवायचेच नाही.