आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: वैष्णोदेवीची खडतर वाट झाली सोपी, 85 मीटर उंचीवरून जाणार रेल्वे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - वैष्णो देवीच्या दर्शनाला जाणा-या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. शुक्रवारपासून वैष्णो देवी यात्रेचा बेस कॅम्प असणा-या कट-यापर्यंत थेट रेल्वे पोहोचणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मिरच्या रियासी जिल्ह्यातील श्री माता वैष्‍णो देवी कटरा रेलवे स्टेशनवर उधमपूर-कटरा रेल्वेला हिरवी झेंडी दाखवली. यावेळी त्यांच्याबरोबर रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांचीही उपस्थिती होती. तसेच जम्मू-काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाही याठिकाणी उपस्थित होते.
दरवर्षी सुमारे एक कोटी भावीक वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जात असतात. कटरा येथून बहुतांश भावीक पायी चालत देवीच्या दर्शनासाठी जात असतात. ज्यांना पायी किंवा खेचरांवर जाता येत नाही त्यांच्यासाठी हेलिकॉप्टर सुविधाही उपलब्ध आहे. हेलिकॉप्‍टर कटरा येथून सांचीघाटापर्यंत पोहोचते. याठिकाणाहून वैष्‍णो देवी केवळ 2 किमी अंतरावर आहे.
रेल्वे मार्गाची वैशिष्ट्ये
उधमपूर-कटरा हा रेल्वे मार्ग 25 किलोमीटर लांबीचा आहे. तो तयार करण्यासाठी 1,132.75 कोटी रुपये लागले. या रूटवर 10 टनल आणि 53 पूल आहेत. हा मार्ग 326 किमी लांबीच्या जम्‍मू-उधमपूर-कटरा-बनिहाल-श्रीनगर-बारामुल्ला मार्गाचाच भाग आहे. हा मार्ग काश्मिरला देशाशी जोडेल. स्वातंत्र्यानंतर डोंगराळ भागातील हा सर्वात मोठा रेल्वे मार्ग आहे. या मार्गावरील केवळ एक 110 किमी लांबीचा कटरा-बनिहाल रूट अद्याप तयार झालेला नाही. हा मार्ग 2017 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
आधी लोकल, मग धावणार एक्‍सप्रेस
जम्मू-उधमपूर दरम्यान आधीच 53 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार आहे. रेल्वे विभागातील अधिका-यांच्या मते जम्मूहून उधमपूर दरम्यान चालणा-या तीन लोकल रेल्वे आधी या मार्गावर कट-यापर्यंत चालवल्या जातील. त्याशिवाय जम्‍मू मेल आणि संपर्क क्रांती एक्‍सप्रेसही कट-यापर्यंत चालवण्याचा विचार आहे. नवीन रेल्वेही लवकरच सुरू केल्या जातील. त्यापैकी एक मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीहून कट-यापर्यंत असेल, अशी शक्यता आहे. उधमपूर आणि कट-या दरम्यान एक लहानसे स्थानक असेल, त्याचे नाव चकरखवाल असे आहे.
फोटो - रेल्वे स्थानकावर सुरक्षेसाठी तैनात असणारे पोलिस कर्मचारी.
पुढे पाहा, या नवीन मार्गाची छायाचित्रे