आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानांच्या हस्ते आज कोयंबत्तूरमध्ये होणार शिव शंकराच्या 112 फूटी मुखवट्याचे लोकार्पण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोयंबत्तूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता महाशिवरात्रीनिमित्त ईशा योग केंद्रात शिवशंकराच्या 112 फूटी मुखवट्याचे लोकार्पण करण्‍यात येणार आहे. ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी या विशाल मूर्तीची निर्मिती केली आहे.

सद्‍गुरु वासुदेव यांनी मूर्तीत दगडाऐवजी स्टीलचे तुकडे वापरण्‍यात आले आहेत. नंदीची मूर्ती तिळचे बीज, हल्दी, भस्म आणि वाळू भरून बनवण्यात आली आहे.
 
महायोज यज्ञाला सुरुवात... 
- कोयंबटूरमध्ये महाशिवरात्री महोत्सवास सायंकाळी 6 वाजता सुरुवात होईल. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महायोग यज्ञाला प्रारंभ करतील. 
- पुढील महाशिवरात्रीपर्यंत किमान 10 कोटी लोक महायोग यज्ञाचा लाभ घेतील.

5 कोटी लोक लाइव्ह पाहातील...
- महोत्सवाचे लाइव्ह टेलिकास्ट सुमारे 5 कोटी लोक पाहातील. 23 सॅटेलाइट टेलीव्हिजन चॅनल्सवर हा कार्यक्रम प्रेक्षपित करण्यात येईल. 
- 7 भाषांमध्ये हा कार्यक्रमा दाखवला जाणार आहे.

12 तास चालेल महोत्सव... 
- महाशिवरात्रीला सायंकाळी 6 वाजता सुरु झालेला महोत्‍सव दुसर्‍या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत चालेल.
- रात्रभर चालणार्‍या महोत्सवात सत्‍संगाचे आयोजन करण्‍यात आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...