आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#ModiBirthday: Celebs ने शेअर केले किस्से, धिरुभाई म्हणाले होते- मोदी लंबी रेस के घोडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनिल अंबानींनी सांगितले की धीरुभाईंनी नव्वदच्या दशकात मोदींबद्दल म्हटले होते, की एक दिवस हे देशाचे पंतप्रधान होतील. - Divya Marathi
अनिल अंबानींनी सांगितले की धीरुभाईंनी नव्वदच्या दशकात मोदींबद्दल म्हटले होते, की एक दिवस हे देशाचे पंतप्रधान होतील.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींना 66 व्या वाढदिवसानिमित्त अमिताभ बच्चन, अनिल अंबानी, लता मंगेशकर, आमिर खान, सायरस मिस्त्री आणि आनंद महिंद्रा या आपापल्या क्षेत्रातील दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेते अमिताभ बच्चन म्हणाले, 'मी 2009 मध्ये त्यांना पा चित्रपट टॅक्स फ्री करण्यासंदर्भात भेटलो होतो. टुरिझमबद्दल त्यांच्याशी वरवरची बातचीत झाली होती. एका आठवड्यानंतर मुंबईतील माझ्या घरी टुरिझमचे अधिकारी आले. त्यांनी मला काम सुरु करण्याबद्दल विचारले. तेव्हापासून आतापर्यंत मी गुजरातचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे.' तर, अनिल अंबानींनी मोदींना शुभेच्छा देताना वडिलांच्या स्मृतींना उजाळा देत म्हटले, 'पापांनी (धिरुभाई अंबानी) सांगितले होते, लंबी रेस के घोडे है, एक दिवस नक्की पंतप्रधान होतील.'
काय म्हणाले अमिताभ बच्चन...
अमिताभ बच्चन म्हणाले, 'मोदींची आणि माझी पहिली भेट 2009 मध्ये 'पा' चित्रपटाच्या निमित्ताने झाले होती. 'पा' टॅक्स फ्री करावा यासाठी मी गुजरातमध्ये त्यांच्या घरी गेलो होतो.'
- 'एका साधारण घरात त्यांची रुमही साधारण होती. ते मला चित्रपटगृहातही घेऊन गेले आणि आम्ही सोबत फिल्म पाहिली. या भेटीत गुजरात पर्यटनासंदर्भातही थोडे बोलणे झाले. त्यानंतर मी मुंबईत परत आलो.'
- 'आठवड्यानंतर माझ्या मुंबईतील घरी गुजरात पर्यटन विभागाचे अधिकारी आले. काही दिवसांतच आपण काम सुरु करु असे ते म्हणाले. हे माझ्यासाठी फारच आश्चर्यजनक होते. तेव्हापासून आजपर्यंत मी गुजरातचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे.'
- अमिताभ म्हणाले, 'मी मोदींना विनंती केली होती की कामाच्या दरम्यान कोणीही नेता मला भेटायला यायला नको. मी गुजरातला पोहोचल्यानंतर पहिला कॉल त्यांचाच आला. त्यांनी सांगितले येथे फार गरमी आहे. थोडा आराम करा आणि खूप पाणी प्या.'
अनिल अंबानींनी काय सांगितले
- '1990च्या दशकात मी प्रथम मोदींना भेटलो होतो. माझे वडील धिरुभाई अंबानी यांनी त्यांना घरी डिनरसाठी बोलावले होते.'
- डिनरनंतर वडिल मला म्हणाले होते, 'लंबी रेस के घोडे छे, लीडर छे, पीएम बनसे'(हे खऱ्या अर्थाने नेते आहेत, एक दिवस नक्की पंतप्रधान बनतील.)
- 'पापांना त्यांच्या डोळ्यांत स्वप्न दिसले होते. ते स्वप्न त्यांच्या लक्ष्याचे होते. जसे अर्जुनासमोर एकच लक्ष्य होते तसे.'
लता मंगेशकर काय म्हणाल्या
- 'तुम्हाला फार विरोध झाला परंतू तुम्ही सत्याच्या मार्गाने निघाले आहात.'
- 'संपूर्ण जग सध्या हिंसाचाराच्या विळख्यात अडकले आहे. मात्र मला विश्वास आहे आपली ध्येय-धोरणे नक्कीच त्यावर विजय मिळवतील.'
आमिर खानने दिल्या शुभेच्छा
- तुमच्या आरोग्यासाठी नेहमी दुआ मागतो. तुम्ही नेहमी आनंदी राहावे.
- आतापर्यंतच्या वर्षांमध्ये हे वर्षा सर्वाधिक यशस्वी ठरावे.
सायरस मिस्त्री काय म्हणाले
- 2012 मध्ये टाटा ग्रुपची जबाबदारी मिळाल्यानंतर रतन टाटा यांच्यासोबत त्यांना भेटलो होतो. या भेटीतून मला लीडरशीपचा एक नवा धडा मिळाला होता.
बातम्या आणखी आहेत...