आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदियोगी शिवाचा 112 फूट उंच पुतळा, जीव ते शिव हा प्रवास म्हणजेच योग-पंतप्रधान नरेंद्र मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोइंबतूर -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाशिवरात्रीच्या दिवशी शुक्रवारी कोइंबतूरच्या (तामिळनाडू) ईशा योग केंद्रात आदियोगी शिवाच्या ११२ फूट उंच पुतळ्याचे अनावरण झाले. योग हा जीव ते शिव असा प्रवास आहे. जीव ते शिवापर्यंतचा प्रवासच योग आहे, असे मोदी म्हणाले. ईशा प्रतिष्ठानचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी या पुतळ्याचे डिझाइन केले आहे.
 
- डिझाइन तयार करण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागली. ईशा फाउंडेशनच्या टीमने तो ८ महिन्यांत पूर्ण केला.
- पोलादापासून निर्मित हा पुतळा धातूचे तुकडे जोडून तयार केला. पुतळ्याचे वजन ५०० टन आहे. यापूर्वी या तंत्रज्ञानाचा वापर कुठेच झाला नाही.
- शिवाचे वाहन नंदीबैलही विशेष पद्धतीने तयार केला आहे. धातूचे ६ ते ९ इंच मोठे तुकडे जोडून नंदीचा वरचा भाग तयार केला.
- ५०० टन पोलादापासून तयार केलेल्या या पुतळ्यात आहे २० टन भस्म, विभूतीसारखी पवित्र सामग्री.
 
अशी झाली पुजा.. 
- कार्यक्रमात तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि केरळच्या राज्यपाल किरण बेदीदेखिल उपस्थित होत्या. 
- सुमारे दोन लाख लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. संतांनी याठिकाणी मंत्रोच्चारही केला. 
- भगवान शंकराला आदियोगी किंवा जगातील पहिले योगगुरू म्हटले जाते. 

मोदी काय म्हणाले.. 
- मोदी म्हणाले, मला याठिकाणी बोलावणारे वासुदेवजी आणि इतरांचे मी आभार मानतो. देव अनेक आहेत पण शंकराला महादेव म्हटले जाते. मंत्रही अनेक आहेत पण शंकराच्या मंत्राला महामृत्युंजय मंत्र म्हटले जाते. अनेक रात्र असतात पण शंकराच्या या रात्रीला महाशिवरात्र म्हटले जाते. मी सोमनाथ च्या धरतीमधून आलोय. पण राजकारणाने मला सोमनाथहून विश्वनाथ म्हणजे काशीपर्यंत पोहोचवले. मी कुठेही गेलो तरी शिवजी माझ्याबरोबर असतात. 

- अगणित वर्षांपासून संकराचे अगणित भक्त आहेत. त्यांच्या भाषा वेगवेगळ्या आहेत. पण त्यांची आस्था केवळ शंकरावर आहे. आगामी काळात आपण ज्या याठिकाणी एकत्र जमलो आहोत, हे स्थळ इतरांसाठी प्रेरणा होईल. याठिकाणी येऊन लोक शिवमय होतील. आज योग फार पुढे पोहोचला आहे. पश्मिेनेही योगाचा अवलंब केला आहे. जिव्हा ते शिवा असा योगाचा प्रवास आहे. 

- शिव आणि पार्वतीची साथ ही हिमालय आणि समुद्राची साथ आहे. ही एकतेची ओळख आहे. शंकराच्या गळ्यात साप आहे. गणेशाचे वाहन उंदीर आहे. म्हणजे ते एकत्र राहतात. हीच विविधतेत एकता आहे. हीच आपल्या संस्कृतीची ओळख आहे.
  
- आज तणावाच्या स्थितीमुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो. लोक दारु पिण्याचे कारण म्हणजे तणावाचे वाढलेले प्रमाण. मला यामुळे फार दुःख होते. पण योगाद्वारे या सर्वावर मात करता येऊ शकते. शरीर मंदिर असेल तर योगा त्याला सुंदर बनवू शकते याचे अनेक पुरावे आहेत. योग हे मुक्तीचे साधनही आहे. 

मोदींचे स्वागत आहे.. 
- वासुदेव म्हणाले, आम्ही या मंदिरात आमचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करतो. त्यानंतर मोदींनी जल अर्पण केले. 
- पंतप्रधानांनी लिंग भैरवी मंदिरातही पुजा केली. मोदींनी त्यानंतर मंदिराचे अनावरण केले. त्यानंतर मोदींनी महायोगा यज्ञाला सुरुवात करण्यासाठी अग्नि प्रज्वलित केली. भगवान शंकराचे वाद्य डमरुहू मोदींनी वाजवले. 
- त्यानंतर जगदगुरुंनी मोदींनी पारंपरिक सुताचा हार घातला. यावेळी मोदींनी आदियोगी नावाच्या एका पुस्तकाचे प्रकाशनही केले. 
- या कार्यक्रमात गायक कैलाश खेर यांनी आदियोगी गीतही सादर केले. 
- या वेळी वासुदेव म्हणाले की, संकटाच्या वेळी आपण वर पाहतो. दोन विचारांमधील मतभेद सध्या वादात परिवर्तित झाले आहेत. यात मानवतेचे मोठे नुकसान झाले आहे. 
- मोदी बहुधा जगातील पहिले असे नेते आहेत ज्यांनी हजारो लोकांबरोबर सर्वांसमोर योगा केला आहे. 

महायोग 
- याठिकाणी महायोग कार्यक्रमही आखण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश आगामी वर्षात 10 लाख लोकांनी योगाचे एक साधे आसन किमान 100 लोकांना शिकवावा असा आहे. 
- पुढच्या महाशिवरात्री पर्यंत किमान 10 कोटी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे. 

5 कोटी लोक लाइव्ह पाहणार 
- या कार्यक्रमाचे लाइव्ह टेलिकास्ट सुमारे 5 कोटी लोक पाहतील. 
- 7 भाषांमध्ये ते प्रसारीत केले जाणार आहे. 
- महाशिवरात्र महोत्सव सायंकाळी 6 वाजता सुरू झाला. तो सकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे.  
- रात्रभर चालणाऱ्या या महोत्सवात सद्गुरुंच्या सत्संगाचा कार्यक्रमही होणार आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS
 
बातम्या आणखी आहेत...